रस्त्यामध्येच नाही तर टोलनाक्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार! टोल नाका वाकल्यामुळे जीवाला धोका-अजून किती बळी घेणार..कुठे नेऊन ठेवले माझे अकोट..
Salim Khan 18 March 2024
Akola : निवडणुका लागल्या की पाच वर्षातील उर्वरित राहिलेले कामे हे रात्रंदिवस लगबगिने सर्व लोकप्रतिनिधी आपापल्या मतदारसंघातील लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.. कारण लोकांसमोर मत मागण्यासाठी कुठल्या तोंडाने जावे हा प्रश्न लोकप्रतिनिधी समोर असतो त्यामुळे सर्वच लोकप्रतिनिधी आमदार, खासदार तयारीला लागतात परंतु संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात आकोट मतदार संघ व अकोला पूर्व मतदार संघ हे एकमेव मतदारसंघ असे आहेत की त्यांना मतदारसंघातील कामे विशेषतःअकोट -अकोला रस्ता याच्याशी काही देणे घेणे नसल्याचे दिसते आहे..विद्यमान दोन्ही आमदार व खासदार भाजप सरकार मधील असूनही यांना अकोट अकोला रस्त्यावर काय घडामोडी घडतात रोज किती अपघात घडत आहेत अनेक लोकांची जीवित हानी होत आहे याचा कुणालाही फरक पडत नाही..त्यामुळे ठेकेदार सुद्धा याच गोष्टीचा फायदा घेत असल्याचे दिसून येते अकोट अकोला हा 45 किलोमीटरचा रस्ता असून यामध्ये टोल नाका उभा करून पुन्हा एकदा मनमानी कारभार सुरू असल्याचे दिसते परंतु टोल नाका दोन दिवसापासून शिकस्त होऊन कधीही अपघात होऊन पुन्हा एकदा बळी घेण्यासाठी सज्ज आहे..त्यामुळे रस्त्यावर होणाऱ्या अपघाताची उरली सुरली कसर आता टोलनाका घेणार आहे..गेली 72 तासापासून या टोल नाक्याला दुरुस्ती करण्यासाठी कुणीच वाली असल्याचे दिसत नाही.फक्त टोल वसुली करिताच या टोलनाकाचा वापर होणार की काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होऊन नागरिकांमध्ये विद्यमान आमदार, खासदार व ठेकेदार यांच्या बद्दल रोष व्यक्त होत आहे.. दोन्हीही आमदारांना तिकीट मिळण्याचा व निवडून येण्याचा आत्मविश्वास असला तरी येणाऱ्या लोकसभा विधानसभा, निवडणुकीतून जनतेचा हा रोष आक्रमकतेने दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही..