राष्ट्रवादी काँग्रेस सह सर्व राजकीय पक्षांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पाठिंबा..रविराज मोरे यांच्या उपोषणामुळे केंद्र व राज्य सरकारची हवा टाईट
RaviRaj 12 April 2025

अकोट
माहिती अधिकार कायद्यामधील पारदर्शकता ही दिवसेंदिवस कमी होत चालली आहे हा कायदा संकुचित करून अधिकाऱ्यांसाठी पळवटा निर्माण केल्या आहेत त्यामुळे भ्रष्टाचार हा जास्त बोकाळला आहे त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम थोडेफार माहिती अधिकार कायद्यामुळे होत असते परंतु भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देण्यासाठी हा कायदा अधिकाऱ्यांसाठी सुपीक करण्यात आला आहे हा सर्व प्रकार गंभीर असून पुढील पिढी भविष्यात या प्रकारामुळे गुलामगिरीत जाण्याची भीती मोरे यांच्या लक्षात आल्यामुळे समाजासाठी थोडेफार योगदान म्हणून मोरे यांनी या चुकीच्या प्रक्रियेच्या विरोधात सरकार विरुद्ध आमरण उपोषणाचे हत्यार उपसलेले आहे

या उपोषणाला वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड प्रकाश आंबेडकर सह राष्ट्रवादी काँग्रेस, ऑल इंडिया पॅंथर सेना, रयत शेतकरी संघटना, कामगार कल्याण संघटना अशा अनेक तळागळातील संपूर्ण महाराष्ट्रातील संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला असून हजारोंच्या संख्येने 14 एप्रिल रोजी या ऐतिहासिक उपोषणाला प्रोत्साहन देण्यासाठी आझाद मैदान मुंबई गाठणार असल्याचेही नमूद केले आहे

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्रेयश चौधरी हे सुद्धा शेकडो कार्यकर्त्यांसह आझाद मैदान मुंबईला येणार असल्याची माहिती आहे विशेषता उपोषण कर्ते रविराज मोरे हे मूळचे अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार येथील रहिवासी असून या निमित्ताने आसेगाव बाजार चे नावलौकिक या उपोषणाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात होणार असून गावाकरिता ही अभिमानाची बाब आहे त्यामुळे विद्यमान सरपंच निलेश नारे यांनी सुद्धा ग्रामस्थांच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला यामध्ये राजू रोकडे सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते

या उपोषणाची ऐतिहासिक दखल म्हणून उपोषणापूर्वीच सरकारने सध्या तरी एका मागणीवर दखल घेतली आहे परंतु उपोषण हे अटळ आहे राज्यातील सर्व स्तरावरून मिळालेला पाठिंबा सत्र सुरूच असल्याने सरकारवर चांगलाच दबाव निर्माण झालेला आहे त्यामुळे सरकारची चांगलीच हवा टाईट झाल्याचे दिसून येते संपूर्ण मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आझाद मैदान सोडणार नसल्याची कठोर भूमिका उपोषणकर्ते रविराज मोरे यांनी घेतली आहे