रविराज मोरे यांचे खा.धोत्रे व दोन्हीही आ.रणधीर सावरकर व प्रकाश भारसाकळे यांना खुले आव्हान..
sagar Lohiya 29 june 2024
मागील सात ते आठ वर्षांपासून अकोट अकोला रस्ता हा सरकारच्या व लोक प्रतिनिधींच्या वेळ काढूपणाच्या धोरणामुळे प्रलंबित आहे या काळात अनेक अपघात झाले आहेत अनेक परिवार रस्त्यावर आले आहेत परंतु एकाही पदाधिकाऱ्याने अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या परिवाराला आर्थिक मदत केली नाही किंवा सरकारकडून मिळवून देण्याचा प्रयत्न सुद्धा झाला नाही.. तसेच आठ वर्षापासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खा.धोत्रे सोबतच या रस्त्याच्या निगडित असलेले दोन्हीही आमदार प्रकाश भारसाकळे व रणधीर सावरकर यांच्याकडून एकही शब्द या रस्त्याच्या कामाच्या दर्जावर बोलण्यात आला नाही “ना झालेल्या अपघातांवर “तसेच रस्ता पूर्ण करायला एवढा वेळ का लागतो आहे यावर निघालेला नाही .. सोबतच कोणताही अधिकारी या प्रकरणात पुढाकार घेऊन जनतेचे समाधान करू शकला नाही या रस्त्याच्या बाबतीत संबंधित अधिकारी हे नेहमी दबावत असल्यासारखे उत्तरे देत असतात परंतु ठोस कारण मागील आठ वर्षापासून जनतेसमोर कोणीच आणले नाही .. जनतेचा आक्रोश त्यांच्या भावना किंवा त्यांचा या रस्त्याच्या बाबतीत गैरसमज असेल तर तो दूर करण्याचा प्रयत्न या दोन्हीही आमदाराकडून किंवा खासदाराकडून झालेला नाही एवढेच नव्हे तर गोड गोड बोलून लोकांचे मने जिंकणारे नितीन गडकरी सुद्धा या रस्त्यावर कोणतेही भाष्य करू शकले नाही.. परंतु अचानक जे मागील आठ वर्षात घडलं नाही ते एका सामान्य व्यक्तीच्या आमरण उपोषणाने घडवून आणलं..
अकोट अकोला रस्त्यासह शेतकऱ्यांच्या सुद्धा महत्त्वाच्या मागण्या करिता समाजसेवक रविराज मोरे हे दिनांक 24 जून 2024 ला जिल्हाधिकारी कार्यालय अकोला समोर आमरण उपोषणाला बसले होते त्यामध्ये रविराज मोरे यांच्या कठोर तीन दिवसाच्या सततच्या आमरण उपोषणानंतर जिल्हाधिकारी यांनी दखल घेऊन तात्काळ आकोट अकोला रस्त्याच्या संबंधित नॅशनल हायवे अथॅरिटी अमरावती विभागीय असलेले भूपेश कथलकर यांना मोरे यांच्या मागणी संदर्भात चर्चा करण्यासाठी अकोला येथे पाचारण केले कथलकर यांच्यासोबत 26 जून ला दोन तासाची चर्चा झाली असता त्यामध्ये रविराज मोरे यांनी केलेल्या सूचना वरिष्ठांना कळवण्यासाठी व त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी एक दिवसाचा वेळ हा संबंधित अधिकाऱ्यांनी मागितला.. व 27 जूनला मोरे यांच्या सूचना मान्य करून तात्काळ त्या सूचनांचे अंमलबजावणी सुद्धा केल्या जाईल असे लिखित आश्वासन दिले.. व ते आश्वासनाची पूर्तता न केल्यास नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या विरोधात हाय कोर्टात जाण्याची मुभा रविराज मोरे यांनी त्यांच्या वकिलाकडून करून घेतली ..
परंतु ह्या सर्व घडामोडी सुरू असतानाच अचानक विद्यमान खासदार धोत्रे व आमदार प्रकाश भारसाकळे आणि रणधीर सावरकर यांचे कौतुक करण्यासंबंधीची बातमी खोट्या फोटोसह रात्री अकरा वाजता अकोल्यातील सर्व पत्रकारांना व्हाट्सअप वर धडकली ही बातमी वाचून सर्व पत्रकार मंडळी मध्ये अचानक गोंधळ निर्माण झाला व एकमेकांना फोन द्वारे या बातमीबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करू लागले परंतु फोटो व बातमी ही परस्पर विसंगत असल्यामुळे पत्रकारांनी आपापल्या दैनिकाचे, चॅनलचे ,प्रसार माध्यमांचा जनतेमधून विश्वास अर्हता कमी होऊ नये म्हणून ही बातमी प्रसारित करण्याचे टाळले ..परंतु अकोल्यातील एकमेव दैनिक देशोन्नती दैनिकाने ‘आज पासून अकोट अकोला रस्ता जनतेच्या सेवेत“ अशा मथळ्याची बातमी 27 जून ला प्रसारित केली.. पण सोबतच अकोट अकोला रस्त्याचा डांबरीकरण झालेला फोटो सुद्धा प्रसारित केला परंतु अकोट अकोला रस्ता हा संपूर्ण सिमेंटचा असल्यामुळे डांबरीकरण चा रस्ता हा कुठला असावा ..गांधीग्राम ते दहीहंडा फाट्यापर्यंत हा रस्ता डांबरीकरणाचा आहे परंतु तो रस्ता वाहतुकीकरिता केव्हाचाच खुला झालेला आहे ..
मग आठ वर्षापासून शांत असलेले लोकप्रतिनिधी खा.धोत्रे व दोन्ही आमदार प्रकाश भारसाकळे, रणधीर सावरकर यांचे अकोट अकोला रस्ता चालू केल्याबद्दल भरभरून कौतुक करणारी बातमी अचानक कशी काय छापून आली.. उद्घाटन प्रेमी असलेले आमदार खासदारांनी अचानक रात्री 11 वाजता कोणत्या रस्त्याचे उद्घाटन केले कुठला डांबरीकरण झालेला रस्ता वाहतुकीसाठी खुला केला , अकोट अकोला रस्ता हा वाहतुकीकरिता कधी बंद होता ! ..असे अनेक प्रश्न देशोन्नती दैनिकावर असलेल्या प्रबळ विश्वासावर या बातमीच्या अनुषंगाने जनतेच्या मनात उपस्थित झाले.. जिल्ह्यातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास संपादन करणाऱ्या दैनिकांमध्ये बातमी प्रकाशित होणे म्हणजेच काळ्या दगडावरची रेष असे समजल्या जाते परंतु या बातमी मधील फोटो व मजकूर याचा काही ठोस संदर्भ लागत नसल्यामुळे वाचकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे सोबतच अकोट अकोला रस्त्याला आठ वर्षे होऊन सुद्धा अकोट तालुक्यातील व या रस्त्याला जोडणारे सर्व गावातील मंडळी खुश आहे सोबतच रस्ता निकृष्ट दर्जाचा झाल्याच्या आनंद व्यक्त करीत असल्याचे बातमीच्या माध्यमातून लोकांकडून स्वतःचे भरभरून कौतुक सुद्धा विद्यमान आमदार खासदारांनी करून घेतले आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पत्रकार आश्चर्यचकित झाले असून या बातमीच्या निमित्ताने भरपूर कुजबुज सुरू आहे व अनेक शंका सुद्धा उपस्थित होत आहेत
रविराज मोरे यांचे उपोषण सोडवण्यासाठी नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे इंजिनियर भूपेश कत्तलकर यांनी संपूर्ण चर्चा करून लेखी स्वरूपात दोन महिन्यात अकोट अकोला रस्त्याचा दर्जा सुधारून पूर्ण केल्या जाईल अशी हमी दिली तसेच या अगोदरच्या ठेकेदाराला टर्मिनेट केल्याची माहिती सुद्धा कत्तलकर यांनी दिली आणि सोबतच रस्ता हा संपूर्ण सिमेंटचा रस्ता असल्याचे सुद्धा एग्रीमेंटच्या कॉपी च्या माध्यमातून कळवले.. आजपर्यंत ज्या चुका झाल्या त्या सर्व दुरुस्त केल्या जातील अशी सुद्धा लेखी हमी कथलकर यांच्याकडून देण्यात आली आहे त्यामुळे मोरे यांच्या उपोषणामुळे भीतीपोटी खा.धोत्रे , आ.प्रकाश भारसाकळे व आ.रणधीर सावरकर यांच्या पायाखालची जमिन सरकल्याची चर्चा सर्वत्र होत आहे..