अकोट आयसीडीएस कार्यालयातील भ्रष्टाचार मी बाहेर काढणारच – सलीम खान..
sagar lohiya 2 Jun 2023
अकोट : मागच्या काळात अकोट आयसीडीएस कार्यालयाकडून अंगणवाडी सेविकांच्या साड्यांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला गेला त्याची तक्रार अनेक माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्याकडून वरिष्ठांकडे करण्यात आल्या परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही..
भ्रष्टाचाराच्या टक्केवारी मध्ये पर्यवेक्षिका,बाल विकास प्रकल्प अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तर आयसीडीएस आयुक्त हे सर्व सामील असल्याचे आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते नूर उस्मान यांनी केले आहे
याचाच अर्थ की या भ्रष्टाचारांमध्ये वरिष्ठांचे हात सुद्धा रंगलेले आहेत सर्व अधिकारी सतत एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहेत
तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते सलीम खान यांनी पर्यवेक्षिका प्रतीक्षा शेगोंकार यांचा कार्यालयीन दौरा दैनंदिनी ची माहीती मागितली असता वैयक्तिक माहिती देऊ शकत नाही असे कारण देऊन कार्यालयाचा भोंगळ कारभार लपवण्याचा प्रयत्न पर्यवेक्षिका प्रतीक्षा शेगोंकार याच्याकडून होत आहे प्रत्येक अंगणवाडी वर दौरा करणे हे वैयक्तिक नसून कार्यालयीन कर्तव्य आहे हे प्रतीक्षा शेगोंकार यांना अजून कळलेले दिसत नाही आणि शेंगोकर यांच्या माध्यमातून माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न बाल विकास प्रकल्प अधिकारी राहुल वरठे यांच्याकडून होताना दिसत आहे ..
भविष्यात अशा अनेक प्रकारचे भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये.. याकरिता प्रतीक्षा शेगोंकार व राहुल वरठे यांचा सर्व खटाटोप चाललेला आहे असे आरोपच सलीम खान यांनी केले आहेत..