INDIA NEWS

Press

संजय आठवले यांने मागितली रविराज मोरे यांच्या परिवारांची माफी ! अकोट पोलिसांची भूमिका संशयस्पद..

Salim Khan 3 March 2024

माफी नको कठोर कार्यवाही हवी”..अन्यथा प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया व केंद्रीय गृहमंत्र्यांना तक्रार करणार….. रविराज मोरे, वरीष्ठ संपादक

Akot: मागील चार महिन्यापूर्वी महा व्हाईस न्यूज पोर्टलचा पत्रकार संजय आठवले यांने जाणीवपूर्वक रविराज मोरे व त्यांच्या कुटुंबीयांची बदनामी व मानहानी होऊन संपूर्ण कुटुंबाला मानसिक त्रास देण्याच्या हेतूनेच मोरे कुटुंबाला कायमस्वरूपी संपवण्याकरिता व आत्महत्येला प्रवृत्त करण्यासाठी चुकीच्या नावांचा उल्लेख करून बातम्या प्रकाशित केल्या त्या विरोधात तात्काळ अकोट शहर पोलीस स्टेशन व पोलीस अधिक्षक अकोला यांच्याकडे मोरे कुटुंबियांकडून पत्रकार संजय आठवले विरोधात तक्रारी करण्यात आल्या परंतु कारवाईच्या भीतीने संजय आठवले यांने अकोट पोलिसांसमोर शरणागती पत्करून रविराज मोरे यांच्या कुटुंबीयांची माफी मागितली असे समजपत्र मोरे यांना देऊन अकोट पोलिसांनी प्रकरण संपवण्याचा बालिश प्रयत्न केला परंतु हे प्रकरण माफीनाम्याचे नसून यामागे रविराज मोरे व त्यांच्या परिवाराविरुद्ध खूप मोठे कट- कारस्थान रचले गेले आहे पत्रकार संजय आठवले हा बातमी लिहिण्यात निष्णात समजला जातो त्यामुळे ही चूक त्याने जाणीवपूर्वक रविराज मोरे व त्यांच्या कुटुंबीयांची सुपारी घेऊनच केली आहे तसेच संजय आठवले च्या आडून विरोधकांकडून मोरे परिवारांवर वचपा काढण्याचा प्रयत्न होत असुन अकोट शहर कायमस्वरूपी मोरे परिवाराने सोडून जावे अन्यथा सर्व कुटुंबियांनी आत्महत्या करून स्वतःचे जीवन संपवावे अशी परिस्थिती संजय आठवले व त्याच्या आडून अनेक अदृश्य शक्ती वेगवेगळ्या मार्गाने निर्माण करीत आहेत..त्यामुळे या सर्व बाबींचा कठोर तपास न करता अकोट पोलिसांनी संजय आठवले याचा माफीनामा घेऊन प्रकरण संपवण्यात धन्यता मानली.. त्यामुळे पुन्हा एकदा आकोट पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त होत आहे..

परंतु इथेच मोरे कुटुंबीय थांबणार नसून पोलीस अधिक्षक, पोलीस महानिरीक्षक, गृहमंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया, यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार करणार आहेत.. महा व्हाईस पोर्टलचा स्वतःला प्रस्थापित पत्रकार समजणारा संजय आठवले विरुद्ध न्याय मिळवण्याकरिता गरज पडल्यास अकोट पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषण करण्याची तयारी सुद्धा मोरे कुटुंबियांनी दाखवली आहे त्यामुळे रविराज मोरे व त्यांचा परिवार अकोट शहरात सुरक्षित नसून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा संवेदनशील प्रकरणाची कठोर चौकशी करून पत्रकारीतेच्या माध्यमातून सुपारी घेणाऱ्यांवर गंभीर कारवाई करणे गरजेचे आहे.. अन्यथा अकोट पोलीस पत्रकार संजय आठवले व त्याच्यामागे असलेल्या अदृश्य शक्तींच्या दबावाखाली काम करीत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित होईल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish