INDIA NEWS

Press

Sanjay Raut : मातोश्री ते दिल्ली | संजय राऊत यांच्या जामिनासाठी भाजपा तयार होईल ? अखेर सुनील राऊतांची भावासाठी धावाधाव

सुनील राऊत हे दिल्लीत ईडीच्या वकिलांना भेटायला गेल्याचं सांगण्यात येत आहे. भाजपाच्या बड्या नेत्याकडून यात मध्यस्थीचा प्रयत्न असल्याचंही सांगण्यात येत आहे.

10 spt 2022

Raviraj

Sanjay Raut

मुंबई : राज्यसभेचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) सध्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी जेलमध्ये आहेत. ईडीने (ED) या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु केली आहे. संजय राऊत यांना सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पण आज अनोखे कनेक्शन आणि कुणालाही विश्वास बसणार नाही, असा प्रयत्न संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत (Sunil Raut)करत असल्याची चर्चा आहे. याविषयी अजून कुणीही खात्री केलेली नाही पण शक्यतांना वेग आला आहे.

संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊत यांनी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली, यानंतर सुनील राऊत हे थेट मुंबई विमानतळाकडून दिल्लीला रवाना झाल्याची चर्चा आहे.

सुनील राऊत हे दिल्लीत ईडीच्या वकिलांना भेटायला गेल्याचं सांगण्यात येत आहे. भाजपाच्या बड्या नेत्याकडून यात मध्यस्थीचा प्रयत्न असल्याचंही सांगण्यात येत आहे. पण संजय राऊत यांना खरोखर भाजपाकडून सॉफ्ट कॉर्नर दिला जाईल का? संजय राऊत यांच्याविरोधात आज भाजपाचे डझनाहून जास्त नेते आहेत, ते संजय राऊत यांना जामीन द्यावा, हे मनापासून मान्य करतील का? हे देखील प्रश्न आहेत.

संजय राऊत यांची सुटका व्हावी, म्हणून जो काही ४ भिंतीत कथित तह होईल, तो भाजपाला आणि संजय राऊत यांच्याविरोधात भूमिका घेणाऱ्या भाजपातील नेत्यांना मान्य होईल का? जे कार्यकर्ते सोशल मीडियावर शिव्या खात होते आणि देत होते, त्यांना देखील हे मान्य होईल का?

जे संजय राऊत दररोज पत्रकार परिषद घेऊन भाजपाला घायाळ करत होते, सामनामधून टीकेचे बाण सोडत होते, ज्या संजय राऊतांनी शेवटपर्यंत मातोश्रीसोबत आपलं नातं अधिक विश्वासाचं आणि घट्ट आहे हे दाखवून दिलं. ते राऊत यूटर्न घेतील का? भाजपा नेते किरिट सोमय्या यानंतर शांततेची भूमिका घेतील का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish