hacklink al hack forum organik hit kayseri escort casibom 895 com girispadişahbet güncel girişdeneme bonusu veren siteler463 marsbahisdeneme bonusu veren sitelersahabetdeneme bonusu veren sitelerviagra onlinetürbanlı porno izle izmir escortvaycasino1winbetbigobetmatiktipobetcasibomistanbul escortultrabet girişmatbetgrandpashabet

INDIA NEWS

Press

सैराट’मधील प्रिन्स अडचणीत; कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

सूरजने नोकरी देण्याचं आमिष दाखवून पैसे उकळल्याचा आरोप सध्या त्याच्यावर आहे.

Ravi Raj

15 spt 2022

Suraj

प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सैराट हा चित्रपट घराघरात लोकप्रिय आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन ६ वर्ष उलटली आहे. मात्र अजून या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. या चित्रपटातील काही सीन तर प्रेक्षकांमध्ये एवढे लोकप्रिय झाले होते की त्याची जोरदार चर्चा झाली होती. या चित्रपटात अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर यांच्यासोबतच प्रिन्स ही भूमिकाही गाजली. या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता सूरज पवार हा अडचणीत सापडला आहे. मंत्रालयात नोकरीचं आमिष देऊन शिर्डीतील एका व्यक्तीला फसवल्याचा आरोप सूरजवर करण्यात आला आहे. त्यामुळे त्याला अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रसारमाध्यामांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यात एक फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंत्रालयात नोकरीला लावतो असे सांगत शिर्डीतील एका व्यक्तीची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना अटक देखील करण्यात आली आहे. सूरजने नोकरी देण्याचं आमिष दाखवून पैसे उकळल्याचा आरोप सध्या त्याच्यावर आहे.

नेवासा तालुक्यातील महेश वाघडकर यांना मंत्रालयात नोकरी देण्याचं आमिष दोन जणांनी दिलं होतं. यासाठी त्यांच्याकडून ५ लाखांची मागणीही करण्यात आली होती. नोकरी लागल्यावर तीन लाख तर सुरुवातीला २ लाख अशी त्यांची बोलणी झाली होती. महेश हे पैशांचं पाकीट देण्यासाठी राहुरी इथे गेले असता त्यांना आपली फसवणूक होत असल्याची समजले. त्यानंतर त्यांनी रितसर अधिकृत तक्रार पोलीस ठाण्यात केली. यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दत्तात्रय क्षिरसागर ( रा. नाशिक ), आकाश शिंदे आणि ओमकार तरटे ( दोघेही राहणार संगमनेर )

अशा तीन जणाांना अटक करण्यात आली आहे.

या सर्व प्रकरणात सैराट फेम अभिनेता सूरज पवार याचाही सहभाग असल्याचे बोललं जात आहे. या प्रकरणी महेश वाघडकर यांच्या फिर्यादीवरून फसवणूक करणे, बनावट शिक्के आणि दस्तऐवज तयार करणे या कलमान्वये संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपींवर कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तसेच लवकरच राहुरीच्या पोलिसांकडून लवकरच प्रसिद्ध सिनेमा सैराटमधील प्रिन्स (सूरज पवार) च्या मुसक्या आवळण्यात येणार असल्याचे बोललं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish