INDIA NEWS

Press

सरकार ॲक्शन मोडवर, शपथविधी “पूर्ण”वेळ राज्य माहितीआयुक्त मिळणार..

Deepak dabhade 22 April 2025

रविराज मोरे यांच्या उपोषणाचा इम्पॅक्ट, तात्काळ राज्य माहिती आयुक्तांची नियुक्ती..शपथविधी संपन्न..

अकोट

रविराज मोरे यांनी 14 एप्रिल 2025 पासून आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण केले होते त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व राज्य माहिती आयोगाकडे सात ते आठ वर्षापासून अपील प्रलंबित असल्याची महत्त्वाची मागणी रविराज मोरे यांनी सरकारकडे उपस्थित केली होती तसेच राज्य माहिती आयोगाकडे प्रलंबित असलेली अपील 90 दिवसात निकाली काढावी याकरिता कायद्यामध्ये ही तरतूद करणे आवश्यक आहे अशी मागणी रविराज मोरे यांची उपोषणादरम्यान केली होती त्यामध्ये राज्य सरकार यांनी मोरे यांच्याशी चर्चा करताना कायद्यामध्ये 90 दिवसाची तरतूद करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून ही तरतूद अंमलात आणून कायदा करण्याची व्यवस्था करण्यात येईल व या सर्व प्रक्रियेकरिता थोडासा वेळ लागणार अशी विनंती राज्य सरकारकडून रविराज मोरे यांना करण्यात आली होती

परंतु तोपर्यंत राज्य माहिती आयोगाकडे प्रलंबित असलेल्या अपील ह्या तात्काळ निकाली काढण्यासाठी पूर्णवेळ राज्य माहिती आयुक्त यांची नियुक्ती करण्यात येईल असे आश्वासन राज्य सरकारकडून मोरे यांना देण्यात आले होते त्याप्रमाणे काल या विषयाचे गांभीर्य समजून राज्य माहिती आयोगांमध्ये राज्य माहिती आयुक्त पदी नेमणूक करण्यासाठी राज्यपालाकडून शपथविधी करण्यात आला मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील जवळपास सर्वच आयोगांवर पूर्ण वेळ राज्य माहिती आयुक्त नसल्यामुळे हजारो अपील प्रलंबित होत्या त्यामुळे अनेक माहिती अधिकार कार्यकर्त्यांना या वेळकाढू प्रक्रियेचा कंटाळा आला होता दहा रुपयाच्या तिकिटावर योग्य माहिती मिळेल याची अपेक्षा माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी सोडली होती सोबतच या वेळ काढू प्रक्रियेचा नाहक त्रास अनेकांना आजपर्यंत भोगावा लागला आयोगाकडे अपील सात ते आठ वर्षे प्रलंबित असल्यामुळे अधिकाऱ्यांची मनमानी सुरू झाली कुणाचाही वचक अधिकाऱ्यांवर राहिलेला नाही गोरगरिबांची पिळवणूक करून भ्रष्टाचाराकरिता मार्ग मोकळा झाला होता या सर्व गंभीर प्रकाराची दखल घेत रविराज मोरे यांनी थेट मुंबई येथील आझाद मैदान गाठून उपोषणाच्या माध्यमातून झोपलेल्या सरकारला जागे केले

आणि सतत तीन दिवस उपोषण केल्यानंतर 17 एप्रिल 2025 ला राज्य सरकार कडून रविराज मोरे यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या व त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू झाली काल राज्य माहिती आयुक्त यांचा शपथविधी होऊन तात्काळ सर्व राज्य माहिती आयोगांना पूर्ण वेळ आयुक्त मिळणार व प्रलंबित असलेल्या अपील निकाली निघणार अशी माहिती राज्य सरकारकडून रविराज मोरे यांना देण्यात आली आहे

प्रतिक्रिया

राज्य सरकारने रविराज मोरे यांच्या उपोषणाची दखल घेत अतिशय महत्त्वाचा विषय आज निकाली काढला आहे व रविराज मोरे यांना आश्वासन दिल्याप्रमाणे या सरकारकडून अंमलबजावणी सुद्धा होताना दिसत आहे
थंड बस्त्यात व निष्क्रिय असलेल्या राज्य माहिती आयोगाला रविराज मोरे यांनी पुनर्जीवित करून चालना दिली त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला या निर्णयामुळे माहिती अधिकार कायद्याचा पुनर्जन्म झाल्यासारखे वाटत आहे ही अशक्य असणारी वाटचाल रविराज मोरे यांनी शक्य करून दाखवली याकरिता रविराज मोरे यांच्यासह सर्व टीमचे कौतुक
करावे तेवढे कमीच..!

तसेच रविराज मोरे हे आसेगाव बाजार येथील रहिवासी असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये सुद्धा या यशस्वी व ऐतिहासिक उपोषणामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे

निलेश नारे, सरपंच आसेगाव बाजार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish