hacklink al hack forum organik hit kayseri escort deneme bonusu veren siteler deneme bonusu veren siteler canlı casino siteleri grandpashabet bahis siteleri casibom 887 com girispadişahbetdeneme bonusu veren sitelermarsbahis462deneme bonusu veren sitelerbetturkeydeneme bonusu veren sitelerdeneme bonusu veren sitelerBahçelievler escortgrandpashabetcasinopopcasinoroyalfixbetmatadorbetmeritking

INDIA NEWS

Press

*सतेचा सारीपाट, अन् स्वार्थाचा तमाशा* ..*

महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा झालेला तमाशा पाहता, यापेक्षा जत्रेतला फड तमाशा बरा होता, असंच म्हणावे लागेल. हे सर्व तमास खोर स्वतःच्या स्वार्थासाठी ग्रामीण जीवन संपवायला निघाले. या सर्व शहरी आमदारांना शेतकऱ्यांच काही देणं-घेणं राहिले नाही. तुम्ही फक्त आत्महत्याच करत राहा, आम्ही तुमच्या घरी 1-2 लाखाचा चेक पाठवून देतो.त्यातच तुम्ही सुखाने व आनंदाने जगा. शेतकऱ्यांच्या जगण्याची किंमत सरकार भिकार चोट चेक देवून चुकवित आहे. असेच चेक घेऊन येणार्‍या नालायक आमदार-खासदारांना, मंत्र्यांना आता गाडगे बाबाचा सोटा दाखवा. आत्महत्या करणाऱ्या ची किंमत सरकारने भिकारी पेक्षाही आता कमी केली आहे. आणि तुमच्याच मतदानावर आमदार-खासदारांची किंमत तर आता अब्जोच्या घरात गेली आहे. कोणतेही आमदार, खासदार, मंत्री येणारे पुढील सरकार हे शेतकऱ्यांच्या बाजूचे राहिले नाही, हे आता यांच्या तमाशावरून सिद्ध झाले आहे असे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष धनंजय काकडे पाटील रोखठोक मत आहे

सर्वच राजकीय पक्षांनी आपला एक राजकीय दलाल प्रत्येक गावात सोडला असून त्याच्यामार्फत या जनतेला भूलवण पाडली जात आहे. छोटी-मोठी लालूच दाखवून हे ग्रामीण जनतेचे मत खरेदी करायला निघाले आहेत. या देशाचे आधारस्तंभ लोकप्रतिनिधी म्हणजेच असलेले आता पक्ष प्रतिनिधी, हे जर विकाऊ असतील तर लोकशाही नक्कीच धोक्यात येईल. देशाचा स्वभाव स्वाभिमान तर हे पक्ष प्रतिनिधी व पक्ष सुद्धा कधीच गमावून बसलेले आहे. गुलाम व लाचारिची सत्ता तयार झाली आहे कारण सर्वच राजकीय पक्षांचा निवडणूक आयोगा ला दिलेल्या हिशोबनुसर जमा झालेला पक्षनिधी पाहता, शासनाची तिजोरी प्रचंड लुटली गेलीअसेच दिसते.आतातरी शेतकऱ्यांनो आपले मतभेद विसरा, शेतकऱ्यां नो आपल्या मनातील एकमेकांच्या बद्दलची आकस दृष्टी बदलून सारे आम्ही एक आहोत हे दाखवा. शेतकऱ्यांनी आप- आपसातील शत्रुत्व कमी केल्याशिवाय हे आता घडने नाही. यांच्या ताकावरच वासरूं होऊन तुमच्या वाट्याला आत्महत्या येत आहेत. या सर्व तस्करांना, व तमास खोराना तुमची किंमत व ताकद दाखवण्याची योग्य वेळ आलेली आहे. तुम्ही तुमची एकत्र ताकद दाखविल्या शिवाय शेतकरी विरोधी कायदे नष्ट होणार नाहीत. नाहीतर या तस्करांच्या ,आमदार खासदार व तमासखोरांच्या हातचे बाहुले बनुन,गुलामीत जगण्या शिवाय तुम्हाला पुढे ईलाज राहणार नाही. सरकारने तुमच्या शेती मालाचे भाव मागण्यासाठी हक्काचे स्वातंत्र्य कधीच काढून घेतले आहे. तुम्ही पिकवलेला शेतातील मालाचे भाव मागण्याचा अधिकार हा तो तुम्हाला असावा, असे वाटत असेल तर शेतकरी संघटनेच्या चळवळीमध्ये सामील व्हा. प्रापंचिक अडचणीमुळे व शेतीमालाला भाव कमी मिळत असल्यामुळे निर्यात बंदी चे धोरण आखून राज्य व केंद्र सरकार हे शेतकऱ्यांना अडचणीत आणत आहे.
जशी तुम्हीआंदोलने करून कापसावरची राज्य बंदी हटविली. मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, व गुजरात मध्ये कापूस जाऊ लागला, तसाच शेतीमाल, इतर धान्य सुद्धा भारत सरकारच्या बंदीतून मुक्त होउन जर अमेरिका, जपान व इतर जगाच्या कोण्या कोपऱ्यात, बाजारपेठेत गेला जागतिक भाव शेतमालाला मिळावे असे तुम्हाला वाटत नाही का? . ही आर्थिक स्वातंत्र्याची लढाई तुम्ही जिंकली तरच शेतकरी सुखी होईल. पुढे तुमच्या मुलाबाळांच्या आत्महत्या जर टाळायची असेल तर आताच योग्य ती पावले उचला. शेतकरी तितका एकच एक.
संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची एक वज्रमूठ दाखवा, तरच तुमच्या बाजूने सरकार झुकल्या शिवाय राहणार नाही. आज मुंबईत 36 आमदार आहेत व ठाण्यामध्ये 24 आमदार आहेत. असे एकूण 60 आमदार एकाच शहरात आहे व संपूर्ण विदर्भात एकूण 62 आमदार आहेत. अजून पुणे, औरंगाबाद नागपूर नाशिक, या मोठ्या शहरातील आमदारांची संख्या अजून शिल्लक आहे. शहरी विभागाचे आमदार विधानभवनात जास्त असतील तर निर्णय शहरी करण्याच्या बाजूने होतील. विधान भवनात शेतकरी संघटनेचे बिल्ले व प्रतिनिधी नसेल तर शेतकऱ्याला कोण विचारणार? आणि तुमचे प्रश्न कसे सुटणार?
शहरीकरणाचे आमदारांची संख्या हे संपूर्ण ग्रामीण भागातील जनतेला या पुढे सुध्दा नाचवणारी आहे. म्हणूनच ठाणे शहरी नेते तयार होऊन संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचा तमाशा करून स्वतः च्या खुर्चीसाठी वळणे घेत आहे. वेळीच जागृत होऊन शेतकरी नेतृत्व सिद्ध करा. ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजुरांनो- जो पुढे धोका आहे , तो या नकली शेतकरी नेत्या पासून जास्त आहे. हे नकली नेते शहराचे गुलाम बनुन ग्रामीण भागाचा सत्यानाश करीत आहेत. काही नकली शेतकरी नेते तर सत्ताधीशाचे भाड्याचे बैल व राजकारणाचे दलाल तयार झालेले आहेत. यांच्या पासून सावध झाले तरच शेतकरी प्रश्न निकालीनिघतील. . . शेतकऱ्याच नाव घेऊन शेतकर्‍यांच्या आत्महत्या घडवून आणणारे नेते आतातरी हाकला. राज्यसभा व विधान परिषदेचा निकाल पाहता भाडखाउ आमदार तयार झाले आहेत. हे त्यांनीच आता जनतेला दाखवून दिले आहे. राजकीय पक्षाला कंटाळून जनतेने अपक्ष आमदारावर जो विश्वास दाखविला होता. तो आता सपशेल खोटा निघाला . हे अपक्ष राजकीय पक्षात सामील होऊन, शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करायला निघाले. ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजूर हे जर आता सावध झाले ,तरच भारत देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा कलंक मिटेल. आपण जो टॅक्स भरतो, या करातून जमा झालेल्या तिजोरीवर हे सर्व नेते मालगुजार होतात. आय.ए.एस व आय.पी.एस. अधिकारी मजा करतात. व तुमच्या कष्टाची तिजोरी वाटून घेतात. शासकीय नोकर महिन्याकाठी हक्काचे पगार घेतात व तसेच टेबलाखालूनही वसुली करतात व चुकीचे बिले दाखऊन , एस्टिमेट प्रमाणे कामे न करता, शासनाच्या कामात भ्रष्टाचार सुध्दा करतात . हे फक्त शासन तिजोरीला लुटण्याचे काम चालू आहे. आमदार खासदार मंत्री जर भ्रष्टाचारी असेल तर नोकरदार भ्रष्टाचारी नक्कीच होईल . म्हणजेच लोकशाही रसातळाला पोहोचत आहे.
हे कसले हिंदुत्व, ना हे कर्तुत्व , हे तर ईडी च्या धाकाने पळून जाणारे झंडूतव.
म्हणूनच शरद जोशींचा साहेबांचा नारा होता.
“कर, कर्जा, नहीं देंगे , बिजली का बिलभी नहीं देंगे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish