स्वातंत्र्य दिनानिमित्त साद खान मजहर खान याच्याकडून “हम सब एक है” हा संदेश देण्याचा गौरवास्पद प्रयत्न..श्रीमती गिताबाई पोटे विद्यालया कडून कौतुक..
mazhar Khan 17 August 2023
अकोट:-१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त “हर घर तिरंगा” या कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती गीताबाई पोटे विद्यालय येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अतिशय उत्साहात साजरे करण्यात आले त्यामध्ये शाळेचे अध्यक्ष शिरीष पोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले असून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वेगवेगळे पारंपारिक देशभक्तीपर गीत गायनाचे व अनेकांनी देशभक्तीपर विचार मांडले या सर्व कार्यक्रमातील गौरवास्पद भूमिका म्हणजे दुसरीत शिकणारा आठ वर्षाचा असलेला साद खान मजहर खान याचे आपल्या देशाची आन-बान शान असलेल्या जवानांची भूमिका सतत मागील दोन वर्षापासून साकारत आहे हे या कार्यक्रमाचे एक विशिष्ट आकर्षण ठरलेले आहे साद खान याचे विचार सुद्धा प्रबळ असल्याचे कौतुक सर्व स्तरावरून होत आहे..
तसेच या कार्यक्रमाला पत्रकार मजहर खान , कु.अर्चना पाटीदार, श्री चव्हाण व मुख्याध्यापिका गावंडे मॅडम यांची उपस्थिती लाभली असून सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष शिरीष पोटे यांनी सर्व अतिथींचे आभार प्रदर्शन करून साद खान सारख्या विद्यार्थ्यांची आजच्या या काळात गरज असून पुढील पिढीसमोर साद खान याने एक महत्त्वाचा आदर्श ठेवला आहे अशा या आपल्या देशावर अतोनात प्रेम व देशहित जोपासणारे संस्कार करणाऱ्या कुटुंबियांचे सुद्धा कौतुक केले.. अकोट सारख्या संवेदनशील शहरांमध्ये साद खान याने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ” हम सब एक है “ असा संदेश दिला आहे.. अशी सर्वत्र चर्चा आहे..