श्री क्षेत्र श्रद्धासागर येथून श्री संत वासुदेव महाराज यांची पालखी हजारो भक्तांच्या उपस्थितीत पंढरपूर कडे रवाना..
RaviRaj 31 May 2023
अकोट :आज श्रीक्षेत्र श्रद्धासागर येथील श्री संत वासुदेव महाराज यांची कर्मभूमी येथून श्री संत वासुदेव महाराज यांच्या पालखी सोहळा हजारो भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला असून महाराजांची पालखी खूप मोठ्या उत्साहात व टाळ्यांच्या गजरामध्ये पंढरपूर कडे रवाना झाली.
त्यामध्ये सर्वप्रथम शिवाजी कॉलेज दर्यापूर रोड जवळ प्रहार चे सुशील पुंडकर यांनी अनेक कार्यकर्त्यांसह पालखीचे दर्शन घेऊन सर्व भक्तांना अल्पोपहार ची व्यवस्था केली..
आज संध्याकाळचे मुक्काम हे अकोट शहरा- मध्येच पुष्पांजली मंगल कार्यालय येथे असून उद्या सकाळी अकोला मार्गे पंढरपूरकरिता पालखी हजारो भक्तांच्या उपस्थिती रवाना होईल या पालखीचे नियोजन व सर्व व्यवस्थापन मोहन पाटील जायले, हिंगणकर , कोरपे अशा अनेक समाजसेवकांनी पुढाकार घेऊन केले आहे