श्रेयश चौधरी यांची शरद पवार राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षपदी वर्णी..! तर अजित पवारांचा घड्याळ दंगलखोर आरोपीच्या हातात..
RaviRaj 15 sept 2024
Akola : काल शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोट तालुकाध्यक्ष पदी श्रेयश शंकरराव चौधरी यांची नियुक्ती केली..
या नियुक्तीने अकोट तालुक्यातील राष्ट्रवादीमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.. सहकार क्षेत्रातील संपूर्ण आयुष्य शरद पवार यांच्या ध्येय धोरणावर खर्ची घालणारे शंकरराव चौधरी यांच्या कार्याची दखल म्हणून नवीन पिढीतील तसेच शरद पवारांच्या धोरणाचा चाळीस वर्षापासून अवलंब करीत असलेल्या वडिलांच्या संस्कारातून घडलेल्या श्रेयश चौधरी यांच्या नियुक्तीने तालुक्यामध्ये पुन्हा एकदा नव्याने राष्ट्रवादीची तुतारी तळागळातील प्रत्येक जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याचे काम या माध्यमातून होणार हे निश्चित ?
परंतु विद्यमान सरकारमधील उपमुख्यमंत्री असलेले अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादीला मात्र अकोट शहराध्यक्ष पदाकरिता कुख्यात असलेल्या दंगलखोरा शिवाय चांगल्या प्रतिमेचा पदाधिकारी मिळत नसल्याची खंत व्यक्त होत आहे..दंगल मधील कुख्यात आरोपी असलेला जाकीर शाह रशीद शाह याच्या हातात घड्याळाचा काटा देऊन पदाचा गैरवापर मात्र निश्चित होणार आहे..
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीसाठी दरमहा पंधराशे रुपये देण्याची योजना सुरू केली परंतु त्याच मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणींना लाखो रुपयांचा चुना लावून अजित दादाचांच शहराध्यक्ष फसवणूक करीत आहे.. एकीकडे अजित पवार आपल्या बहिणींना विधानसभेच्या पार्श्वभूमीवर खुश करण्याचा प्रयत्न करीत आहेत व दुसरीकडे अजितदादांचा पदाधिकारी अनेक बहिणींना लाखो रुपयांचा गंडा घालत आहे..त्यामुळे जाकीर शाह सारख्या कुख्यात दंगलखोराला अजित दादा पाठीशी का घालत आहेत.. समाजातील अशा विकृत व घातक प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्याऐवजी उलट त्यालाच शहराध्यक्ष पदावर बसवले असे अनेक प्रश्न बहिणींच्या मनात उपस्थित झाले असून शहराध्यक्ष पदासाठी सक्षम नेतृत्व देण्याचा प्रयत्नच अजितदादांच्या जिल्हाध्यक्षांनी केल्याचा दिसत नाही व बहिणींप्रती उपमुख्यमंत्री अजित पवार हे गंभीर नसून पुन्हा एकदा अजित दादांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे.
नवनियुक्त अकोट तालुकाध्यक्ष श्रेयश चौधरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार..
त्यासोबतच शरद पवार यांनी उशिरा का होईना अकोट सारख्या संवेदनशील तालुक्याला अतिशय योग्य व चांगल्या प्रतिमेच्या नेतृत्वाला म्हणजेच श्रेयश चौधरी यांना तालुकाध्यक्ष नियुक्त करून राजकारणातील पुन्हा एकदा दांडग्या अनुभवांचे दर्शन घडवले..