शेतकऱ्यांमध्ये आक्रोश, फडणवीस सरकार फेल.. सॉफ्टवेअर बंद पडले की पाडले, अनेक शंका उपस्थित..
Chanchal pitambarwale 18 Feb 2025
मागील बारा दिवसापासून सीसीआय ची कापूस खरेदी बंद आहे सॉफ्टवेअर बंद असल्यामुळे कापूस खरेदी बंद असल्याचे सीसीआयचे अधिकारी सांगतात परंतु सॉफ्टवेअर मध्ये कोणतीही अडचण आल्यास इतका वेळ लागत नाही भारत सरकारच्या अंतर्गत असलेली सीसीआय खरेदी ही बंद ठेवून शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नसल्याचे स्पष्ट दिसून येते सरकारला कापूस खरेदीसाठी थोडा वेळ मिळावा व पुढील कापूस खरेदी करिता पैसा उभा करता यावा याकरिता हा सर्व चाललेला खटाटोप आहे सोबतच कापसापासून प्रक्रिया केलेली गाठ ठेवण्यासाठी गोडाऊन उपलब्ध नसल्याचेही माहिती आहे त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अनेक आश्वासने देऊन सुरू केलेल्या योजना चालवण्याकरिता भारत सरकार सुद्धा हतबल झाल्याचे दिसते..

सीसीआय कापूस खरेदी मागील बारा दिवसापासून बंद..
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कापसाचे भाव हे चांगले राहतील या अपेक्षेने शेतकरी कापूस विक्री लवकर करीत नाही शंभर पाचशे रुपयांच्या आशेपोटी सहा सहा महिने शेतकरी हा कापूस आपल्या घरात स्वतःच्या लेकरा सारखा जपून ठेवतो वर्षभर मेहनत करून एक एक बोंड वेचून शेतकरी कापूस पिकवतो परंतु ऐन कापूस विकण्याच्या वेळेवर कापसाचे भाव हे अपेक्षेपेक्षा कमी होतात त्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे यावर एक छोटासा दिलासा म्हणून सीसीआय च्या खरेदीने शेतकऱ्याला हमीभाव मिळेल अशा अशा पल्लवीत होत असतात खाजगी व्यापारापेक्षा सीसीआय जास्त भावाने कापूस घेत असल्यामुळे शेतकऱ्यांची ओढ ही सीसीआय ला कापूस विकण्याची असते परंतु सी सी आय ची खरेदी मागील 12 दिवसापासून बंद असल्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झालेला आहे खरेदी बंद असल्यामुळे लाखो क्विंटल कापूस शेतकऱ्याच्या घरात पडलेला आहे सॉफ्टवेअर बंद असल्यामुळे सीसीआयची खरेदी बंद आहे असे बोलल्या जाते एवढी मोठी भारत सरकारची यंत्रणा असल्यावरही सॉफ्टवेअर इतके दिवस बंद कसे राहते नया भारत विकसित भारताची यंत्रणा कुचकामी तर नाही ना ?

की पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फक्त विधानसभा जिंकायच्या होत्या म्हणूनच लाडक्या बहिणी प्रमाणेच शेतकऱ्यांना सुद्धा सीसीआयच्या खरेदीचे चॉकलेट दिले असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण करणारे आहेत भारत सरकार अंतर्गत असलेल्या सीसीआय चे सॉफ्टवेअर हे खूप प्रबळ असल्याचे जाणकार सांगतात त्यामुळे सॉफ्टवेअर मध्ये कोणतीही अडचण आल्यास दुरुस्ती करिता इतका वेळ लागणार नसल्याचा सुद्धा दावा करतात त्यामुळे सीसीआय भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांची का फसवणूक करीत आहे हे मात्र येणारा काळच ठरवेल
प्रतिक्रिया
सीसीआय कपास खरेदी ये पुरे महाराष्ट्र मे बंद है हमारे सॉफ्टवेअर मे कुछ वायरस आ गया है इसीलिए कपास खरेदी बंद है हमारे आयटी टेक्निशन सॉफ्टवेअर दुरुस्त करने की कोशिश कर रहे है आने वाले दो या तीन दिन मे सॉफ्टवेअर शुरू होने की संभावना है तभी हम कपास खरेदी कर पायेंगे
शैलेंद्र तिवारी, सीसीआय अकोट
प्रतिक्रिया
सर्व शेतकऱ्यांना आवाहन आहे की कोणीही गोंधळून जाऊ नये अफवांवर विश्वास ठेवू नये येणार्या दोन-तीन दिवसात सीसीआयची कापूस खरेदी पूर्वीसारखी पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे
सुधाकर दाळू, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट