INDIA NEWS

Press

शेतकरी मंत्रालय स्थापन व्हावे यासाठी गडचिरोली येथे हजारो लोकांच्या उपस्थितीत चर्चासत्र संपन्न – धनंजय पाटील काकडे

RaviRaj 16 Feb 2023

मार्गदर्शन करताना धनंजय पाटील काकडे

गडचिरोली- शेतकरी- वारकरी- कष्टकरी महासंघाच्या जनजागर यात्रेचे गडचिरोली येथे आगमन झाल्यावर भव्य स्वागत करण्यात आले. ही जनजागर यात्रा शेतकरी नेते श्री धनंजय पाटील काकडे यांच्या नेतृत्वात देहू ते पंढरपूर येथे जात आहे. तीर्थक्षेत्र देहू येथून दि.1 फेब्रु.2023 ला निघालेली जनजागर यात्रा पुढे भेटी देत , स्व. शरद जोशी यांचेस्मृती स्थळ आंबेठाण, ओझरगणपती, शिर्डी ,नाशिक, गुरुकुल आश्रम, मोझरी, सेवाग्राम, नागपूर असा मार्गक्रमण करीत पुढे अड्याळ टेकडीवरून दि 14 फेब्रुवारी 2023 ला दुपारी दोन वाजता गडचिरोली येथे पोहोचली. शासकीय रेस्ट हाऊस गडचिरोली येथे गुरुदेव सेवक मंडळी, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व आरपीआय चे संयुक्त आघाडीचे नेते बैठकीला उपस्थित होते. पुढे ही जागर दिंडी चंद्रपूर, राळेगाव, यवतमाळ वरून वाशिम, सोलापूर, पंढरपूरला जात आहे. तसेच दीं.21 फेब्रुवारी 2023 ला ( सांगोला रोड ग्रामगीता दर्शन मंदिर ,) पंढरपूर येथे या जनजागर यात्रेचा समारोप होईल. देशाला आर्थिक स्वातंत्र्याची प्रेरणा देणारे शरद जोशी, व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेतून अड्याळ टेकडी येथे ग्राम स्वराज्याची संकल्पना स्व. तुकाराम दादा गीताचार्य यांनी मांडली.
वारकरी संप्रदाय पंढरीच्या दर्शनाला जाऊन दरवर्षी विठ्ठलाला साकडे घालतो, ” पाऊस येऊ दे व शेतकरी सुखी होऊ दे.”

शेतकरी मंत्रालय स्थापन व्हावे याकरिता निघालेली जनजागर यात्रा

प्रत्येक आषाढी एकादशीला व कार्तिक एकादशीला मुख्यमंत्री सुद्धा तेच गाणे गातो, पाणी येऊ दे व शेतकरी सुखी होऊ दे, मग राजा आणि प्रजा दोघेही सारखेच मागणी घालत असताना शेतकरी का सुखी झाला नाही? तर 18 जून 1951 ला 150 शेतकरी विरोधी कायदे होऊन शेतकरी संपविण्याचे कटकारस्थान रचण्यात आले. हे कायदे रद्द झाल्याशिवाय शेतकरी सुखी होऊ शकत नाही.
या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ.शिवनाथ कुंभारे म्हणाले- ग्रामस्वराज्याच्या संकल्पनेसाठी ग्रामसभा ही सर्वोच्च आहे, ग्रामसभेला गावातील लोकांनी उपस्थित राहून गावातील एकत्र निर्णय घ्यावे व विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करावे. शेतकरी- वारकरी- कष्टकरी महासंघाचे अध्यक्ष श्री धनंजय पाटील काकडे म्हणाले – शेतकरी हा देशाचा कणा आहे, परंतु राज्य व केंद्र शासनाने त्याला बंधनात अडकवून शेतकरी विरोधी कायदे तयार केले, त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक अडचणीतून जावे लागते. शेतकऱ्यांनी जर शेतीमालाला भाव मागितला तर त्याच्यावर अश्रुधुराचे नळकांडे, गोळीबार व कोर्ट केसेस दाखल करून, तो शेतकरी कायद्याच्या व शासनाच्या नजरेत गुन्हेगार असतो.
केंद्र शासनाने वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा केला. वाघ, डुक्कर, अस्वल, नीलगाई, हरण, वानर यां वन्य प्राण्यांमुळे पिकाची नासाडी होऊ नये म्हणून शेतावर पहारा द्यावा लागतो, व रात्रीला शेतात पाणी द्यावे लागते. या देशात वन्य प्राण्यांना संरक्षण आहे पण शेतकऱ्यांना संरक्षण नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान धोक्यात चालले आहे. शेतकरी विरोधी कायद्यामुळे शेतकरी, हवालदिन व मेटाकुटीस आला. शासन औद्योगीकरण व शहरीकरणाला डोक्यावर घेऊन नाचत आहे व शेतकऱ्यांना जिवंत मारते. सर्व जाचक अटी या शेतकऱ्यालाच का भोगाव्या लागतात? भारतीय अर्थव्यवस्थेत शेतकऱ्यांची भूमिका ही अनमोल आहे. राज्य व केंद्रशासन चुकीचे धोरणे राबवत असल्यामुळे त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी या देशात शेतकरी मंत्रालय स्थापन झाले पाहिजे. या देशात क्रीडा मंत्रालय आहे. शेतीच्या व्यवस्थेसाठी कृषी मंत्रालय, महसूल मंत्रालय आहे, परंतु यातूनच शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण झाले व तेच प्रश्न सोडविण्या साठी , शेतकऱ्यांना न्याय, व हक्कासाठी मात्र शेतकरी मंत्रालय झाले नाही. ही या देशातील मोठी शोकांतिका आहे? यावर
सर्विस्तर चर्चा करण्यात आली.

शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे जनजागर यात्रेचे चर्चासत्र

या चर्चा सत्रात श्री अरविंद वासेकर, पंडित पुरके , गुरुदेव भोपाये , रोहिदास राऊत, पांडुरंग घोटेकर, राजू जक्कवार , हंसराज उंदीरवाडे, अशोक खोब्रागडे, अरुण नेताम, सालोटकर व भास्कर नरूले ,सुशीला वगरे बडनेरा , अर्पित लांजेवार , लक्ष्मीबाई पिसे अमरावती व शहरातील अनेक नामवंत वकील, तसेच डॉक्टर्स व पत्रकार मंडळी यावेळी हजर होती . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरुण भाऊ मुनघटे यांनी विशेष प्रयत्न केले.या कार्यक्रमाला चंद्रपुर , अमरावती इत्यादी ठिकाणचे प्रतिष्ठित व्यक्ती , व गडचिरोली येथील कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish