एसटी वाहतूक कोलमडली, जागेसाठी हाणामारी, प्रवासी आक्रमक..
RaviRaj 25 March 2025
डेपो मॅनेजर सह सर्व जबाबदार अधिकारी निलंबित..
लाडक्या बहिणीचे अतोनात हाल ज्येष्ठ नागरिक सुद्धा बेहाल..
अकोट
अकोट मतदार संघ हा झोपलेल्या अवस्थेत असल्याचे दिसत आहे मागील काळात साधारणतः पंधरा दिवसापूर्वी अकोट आगारातील एसटी जळून खाक झाली होती त्यामध्ये काही प्रवासी थोडक्यात बचावले या सर्व प्रकरणाचे खापर आगार प्रमुखासह पाच ते सात कर्मचाऱ्यांवर फोडले गेले यामध्ये सर्व जबाबदार अधिकारी निलंबित झाले जळून खाक झालेली एसटी बस ही मर्यादे पेक्षा जास्त किलोमीटर चालली आहे तसेच वयोमान सुद्धा या गाडीचे संपलेले आहेत आगारामध्ये सध्या स्थितीत सुरू असलेल्या सर्व बसेस भंगार झालेले आहेत त्यासोबतच अकोट आगाराला 40 ते 50 बसेसची आवश्यकता आहे अकोट चे प्रतिनिधित्व करणारे आमदार यांच्या निष्क्रिय कार्यपद्धतीचा फटका हा नेहमीच अकोट आगाराला बसला आहे योग्य पाठपुरावा केल्यास आज पर्यंत नवीन एसटी बसेस सह बस डेपो सुद्धा सुधारित झाला असता परंतु मतदार संघाचा विकास हा म्हातारा झाल्यामुळे एसटी प्रवाशांचे हाल बेहाल सुरू आहेत यादरम्यान काल बस स्टॅन्ड मधील गंभीर घटना समोर आली
बस मधील जागा मिळवण्याच्या वादावरून दोन प्रवाशांमध्ये अक्षरशः हाणामारी झाली असून हा वाद शहर पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचला यामध्ये पोलिसांनी तक्रार दाखल करून योग्य ती कारवाई केली दोन तास बसची वाट बघून सुद्धा जागा मिळवण्यासाठी लाडक्या बहिणींना तसेच ज्येष्ठ नागरिकांना संघर्ष करावा लागतो बसची प्रवासी मर्यादा ही 40 ते 50 असून 100 च्या वर प्रवासी या बस मध्ये प्रवास करतात बसेसचे वेळापत्रक नाही अकोट आगाराला डेपो मॅनेजर नसल्यामुळे मनमानी कारभार सुरू आहे बसेसची निश्चिती नाही या सर्व प्रकाराला जनता कंटाळलेली असून पूर्ण तिकीट देऊन सुद्धा बसमध्ये चढण्यासाठी एवढा मोठा संघर्ष करावा लागतो तरी वेळेत प्रवास होत नसून प्रवाशांवर सतत पश्चाताप करण्याची वेळ आली आहे त्यामुळे पूर्ण तिकीट असणारे प्रवासी हे खाजगी वाहतुकीचा पर्याय शोधताना दिसत आहेत खोट्या योजनांचे अमिष दाखवून महायुती सरकारने जनतेची फसवणूक केलेली आहे यापुढे अकोट कर मात्र महायुती सरकारच्या खोट्या आश्वासनाला बळी पडणार नाही असा निश्चय प्रवाशांनी केला आहे लाडकी बहीण व ज्येष्ठ नागरिकांच्या योजना सरकारी तिजोरी भरण्याचे काम करीत असतील परंतु लाडका भाऊ मात्र प्रवासाच्या ओझ्याखाली पुरता दबून गेला आहे अक्षरशः त्याचे कंबरडे मोडले आहे अशी खंत अनेक प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे