स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष तसेच थोर पुरुषाचे अखंड हिंदुराष्ट्राचे स्वप्न जन जागृती रॅली चे अखिल भारत हिंदू महासभे तर्फे आयोजन…
रविराज
अकोला :- आज 14 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान मोठ्या जल्लोषात सुरु असुन यातुन राष्ट्रप्रेम व देशभक्ती ची मोठी लाट आली असुन हिंदु महासभेच्या नेत्यांचे अखंड हिंदुराष्ट्राचे स्वप्न पूर्णत्वास करण्या करीता व देशाला हिंदुराष्ट्र बनविण्या करीता युवक युवतींनी पुढाकार घ्यावा तसेच भौगोलिकदृष्टया भारताचे अनेक प्रांत,राज्ये, संस्थाने साम्राज्ये यात विभागला गेला आहे याचे एकत्रिकरण व्हावे याचे स्मरण म्हणून 14 ऑगस्ट हा अखंड भारत दिवस साजरा केला जातो या निमित्त अखिल भारत हिंदु महासभा अकोला जिल्हा तर्फे स्थानिक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हिंदु धर्माचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून स्थानिक वि.दा.सावरकर पुतळा रेणुका नगर, डाबकी रोड येथुन भव्य मोटर सायकल तिरंगा रॅलीचे आयोजन हिंदुमहा सभेचे कार्याध्यक्ष श्रीराम दिलीप पांडे ब्राह्मण महासंघाचे कार्याध्यक्ष अमोल चिंचाळे , हिंदुमहासभे चे प्रदेश उपाध्यक्ष मनिष देशपांडे ,यांच्या नेतृत्वात करण्यात आले या रॅलीत पवन जोशी,कोमल जोशी , शिल्पा देशपांडे,काजल रजवैद्य,अमृता सेनाड ,कल्याणी देशपांडे, ऋतुजा थोरात, सचिन पाटील,मनिष राठोड,अतुल पाटील , यशोधन गोडबोले , उदय महा, कुशल सेनाड, योगेश कुळकर्णी, दीपक शिरसाट,भूषण व्याघ्राम्बरे,पुरुषोत्तम आगरकर , ऋषभ पाटील,भानुदास देशपांडे,प्रकाश जोशी, गोपाल रजवैद्य,दीपक गवारे,विजय सावरकर, विशाल मोरे , आदित्य जैसुर , सोहम पांडे ,विजय काळदाते,सतिश माळी ,प्रकाश रजवैद्य, श्याम कुलकर्णी,अभिजीत जोशी ,अनिल धर्माधिकारी ,सुनिल वानखडे ,सागर पाठक, समीर पुजारी, धनंजय देशमुख,सतिष गावंडे , डॉ.सुभाष देशपांडे , अॅड अमोल बोरेकर, श्याम चेंडके, लक्ष्मीकांत रेलकर ,अनुप कापसे , संतोष पीटकरी,अरुण दुधाळकर, राजपुत , निलेश मोरवाल हिंदुराष्ट्र प्रेमी युवक युवतींचा असंख्य मोठ्या प्रमाणात सहभाग हा अकोला शहरामध्ये दिसून आला असून पुढील काळात सुद्धा अकोला शहरांमध्ये अशाच असंख्य युवा युवती मध्ये हिंदू राष्ट्राची भावना तळागळात पोहोचावी असा प्रयत्न अकोला शहराचे हिंदू महासभेचे कार्याध्यक्ष श्रीराम पांडे यांच्याकडून होताना दिसत आहे