टक्केवारीच्या खेळात आकोटकर मात्र हताश..! मुख्याधिकारी की कटपुतली
Deepak dabhade 23 April 2025

अकोट : नगरपालिका येथील मुख्य अधिकारी तथा प्रशासक डॉ.नरेंद्र बेंबरे यांच्या हुकुमशहा कार्यपद्धतीला सर्व अकोटकर कंटाळले असून निवडणुकीची आतुरतेने वाट बघत आहे मागील तीन वर्षापासून अकोट नगरपालिकेवर प्रशासक आहे सरकारकडून जाणीवपूर्वक निवडणुकींना बगल देण्याचा प्रयत्न न्यायालयाच्या मार्फत केला जात आहे या माध्यमातून सतत लोकशाहीची गळचेप्पी करण्याचे काम हे सरकारकडून होत आहे याचाच फायदा अकोट नगरपरिषद चे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ नरेंद्र बेंबरे घेत आहेत

तसेच विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या मर्जीप्रमाणे मुख्याधिकारी वागत असल्याचे निदर्शनास येते अकोट मधील उच्चभ्रू असलेला एरिया हा अंबिका जिन मधील गीता नगर कॉलनी ओळखल्या जाते या कॉलनी मध्ये नमांकित पखाण हॉस्पिटल, शिकवाल हॉस्पिटल तसेच माजी आमदार संजय गावंडे व सर्व जिनिंग प्रेसिंग व्यावसायिक मंडळींचे वास्तव्य आहे तरीसुद्धा या कॉलनीचा विकास हा जाणीवपूर्वक केला जात नाही

या कॉलनीमध्ये नाल्या नाहीत, रस्ते नाहीत, कोणत्याही प्रकारच्या प्राथमिक सुविधा सुद्धा नाहीत अकोट शहरांमधील आज रोजी असा एकही भाग अविकसित नाही जवळपास सर्वच ठिकाणी रस्ते, नाल्या, ह्या अत्यावश्यक सेवा मिळालेल्या आहेत परंतु अकोट शहरांमधील दिग्गजांचा एरिया असून सुद्धा फक्त आणि फक्त आमदार प्रकाश भारसाकळे यांचा विरोधक पत्रकार रविराज मोरे या ठिकाणी राहत असल्यामुळे बदल्याची भावना ठेवून वचपा काढण्याच्या हेतूने मुख्याधिकारी नरेंद्र बेंबरे यांनी मोरे यांच्या घराजवळचा एकच रस्ता केला नाही संपूर्ण कॉलनी मधील रस्ते नाल्या ह्या विकसित केल्या परंतु रविराज मोरे यांच्या घरासमोरील एकमेव रस्ता हा मुख्याधिकारी यांनी जाणीवपूर्वक होऊ दिला नाही याचाच अर्थ रविराज मोरे समोर विद्यमान आमदार व मुख्याधिकारी नरेंद्र बेंबरे यांची ताकद बोथट झाली आहे

रविराज मोरे यांच्यावर वचपा काढण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे हताश होऊन फक्त रस्ता व नाली न करणे एवढेच मुख्याधिकारी बेंबरे यांच्या हातात शिल्लक राहिले आहे त्यामुळे रविराज मोरे यांच्या बेधडक कार्यपद्धतीसमोर मुख्याधिकारी व विद्यमान आमदार खूपच जास्त हतबल झाल्याचे दिसून येते या प्रकारचे घाणेरडे राजकारण करून रविराज मोरे यांच्यावर दबाव आणण्याचा हा एक आगळावेगळा उपक्रम मुख्याधिकारी राबवण्याचा प्रयत्न करीत आहे अशा प्रकारचा मानसिक त्रास देऊन रविराज मोरे यांचे लेखणी स्वातंत्र संपवण्याचा प्रयत्न सर्व स्तरावरून केल्या जात आहे परंतु रविराज मोरे यांच्या घरासमोरील रस्ता नाही झाला नाली तुडुंब भरली, घाणेरडे पाणी रस्त्यावर वाहून आरोग्य विषयक समस्या निर्माण झाल्या तरीसुद्धा रविराज मोरे यांचे बेधडक लेखणी चे कार्य सुरू राहील कोणत्याही दबावाला तसेच मानसिक त्रासाला रविराज मोरे हे बळी पडणार नाहीत असे खुले आव्हान मोरे यांनी दिले आहे