INDIA NEWS

Press

तेल्हारा: आजादी का ७५ वा अमृत महोत्सव “एकात्मिक बाल विकास सेवा योजना तेल्हारा यांच्याकडून विशेष उत्साहात साजरा.”..

साहिल बोदडे

14 August 2022

छाया: हिवरखेड मधील अति उत्साहात साजरा झालेला कार्यक्रम

हिवरखेड: एकात्मिक बाल विकास सेवा योजना तेल्हारा अंतर्गत हिवरखेड येथे “हर घर तिरंगा”आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रम हा दि.१४/८/२०२२ ला अति-उत्साहात पार पडला त्यामध्ये सर्वप्रथम उत्कृष्ट असे थोर महापुरुषांचे व सर्वधर्मसमभाव वेशभूषा केलेले अंगणवाडी मधील छोटे छोटे मुलांनी “देश रंगीला” या गाण्यावर अतिशय सुंदर असे नृत्य सादर केले त्यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतीस यांनी सुद्धा भाग घेतला अशा विषेष कार्यक्रमाला जि.प.अकोला चे मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला बालकल्याण) यांची उपस्थिती होती. तसेच मा. विलास जी मरसाळे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण जि.प.अकोला.)मा. राहुल जी वरठे (बाल विकास प्रकल्प अधिकारी तेल्हारा ) श्रीमती वैशाली बोदडे (पर्यवेक्षिका) तेल्हारा सर्कल मा. अतुल चव्हाण (संरक्षण अधिकारी तेल्हारा) मा. सौ. सुलभाताई दुतोंडे (जि.प. सदस्य)मा. रमेश भाऊ दुतोंडे उपसरपंच हिवरखेड व मारुती कडू यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी पदाधिकारी तेल्हारा सर्कल मधील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित राहून कार्यक्रमाला विशेष आनंदाचे स्वरूप व उत्साह निर्माण करून कार्यक्रम यशस्वीरित्या व नियोजनबद्ध पार पाडण्याकरिता श्रीमती वैशाली ताई बोदडे व त्यांचे तेल्हारा सर्कल मधील संपूर्ण सहकारी मंडळींनी अतोनात परिश्रम घेतले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish