त्या वेळेला शिवसेना शेपूट घालून का बसली होती? मनसे नेते संदीप देशपांडेंचा सवाल?
कोणताही प्रकल्प महाराष्ट्रातून का जातोय, याची राजकारण विरहित चौकशी झाली पाहिजे. सर्वपक्षीय नेत्यांनी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी आमची मागणी असल्याचं देशपांडे यांनी सांगितलं.
Raviraj
15 spt 2022
मुंबईः वेदांता प्रकल्प (Vedanta Project) महाराष्ट्रातून गुजरातेत जाण्यावरून सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि मनसेवरही टीका करण्यात आली आहे. यावर मनसे नेते संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांनी शिवसेनेवर आगपाखड केली आहे. ज्या वेळाला राज ठाकरे आणि मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी बिहारी लोक इथल्या नोकऱ्या पळवतात, असा आरोप करत आंदोलन केलं होतं, त्यावेळेला शिवसेना किंवा पक्षाचे नेते शेपूट घालून का बसले होते, असा सवाल संदीप देशपांडे यांनी केलाय.
राज ठाकरेंच्या कामाचा इतिहास पाहिला, तर त्यांना महाराष्ट्राच्या हितापुढे कुणीही महत्त्वाचं नाही. महाराष्ट्राचा विषय येतो तेव्हा ते स्वतःच्या भावालाही सोडत नाहीत. त्यामुळे त्यांनी आमच्याविषयी काळजी करू नये, स्वतःच्या पक्षाचे वाभाडे निघतायत, त्याचा विचार करा, असं वक्तव्य संदीप देशपांडे यांनी केलंय.
आदित्य ठाकरे टेस्लाचा प्रकल्प आणणार होते, त्याचं काय झालं, असाही सवाल आहे.
कोणताही प्रकल्प महाराष्ट्रातून का जातोय, याची राजकारण विरहित चौकशी झाली पाहिजे. सर्वपक्षीय नेत्यांनी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी आमची मागणी असल्याचं देशपांडे यांनी सांगितलं.