INDIA NEWS

Press

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दबाव, मिटकरींची नौटंकी – पण अधिकारी ठाम !

salim Khan 6 September 2025

Akola: उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राजकीय दादागिरी पुन्हा एकदा उघड झाली आहे. आयपीएस अंजना कृष्णा यांना धमकावूनही त्यांनी अवैध उत्खनन करणाऱ्या गुंडांविरुद्ध गुन्हे दाखल करून प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडले होते. अगदी तसाच प्रकार अकोल्यातील पोलीस अधीक्षक आयपीएस बच्चन सिंग यांच्यासोबत घडला.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला केला होता. हा प्रकार घडताच अजित पवारांनी थेट बच्चन सिंग यांना फोन करून आदेश दिले – “मिटकरी हे आमचे आमदार आहेत, त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांवर कठोर गुन्हे दाखल करून अटक करा!” म्हणजे कायद्याला बगल देऊन केवळ पक्षनिष्ठा जपण्यासाठी पोलीस यंत्रणेला गुलाम बनवण्याचा उघड प्रयत्न झाला.

पण बच्चन सिंग यांनी या दबावाला न जुमानता कायद्याप्रमाणेच कारवाई केली. यामुळे संतापलेल्या मिटकरींना स्वतःच्या मुलीसह पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पायऱ्यांवर बसून धरणे आंदोलन करावे लागले. मात्र त्यांचा हा नाटकी दबावसुद्धा फसला.

या घटनेतून हे स्पष्ट दिसते की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आयपीएस अधिकाऱ्यांवर दबाव टाकून कायदा वाकवण्याचा प्रयत्न सतत करतात. पण त्यांचे डाव पुन्हा पुन्हा फसत असून स्वतःवरच नामुष्की ओढवून घेत आहेत.

सर्वात मोठा प्रश्न असा की – जर अंजना कृष्णा यांच्या जागी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आयपीएस अधिकारी असती आणि केरळमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारची दादागिरी केली असती, तर अमोल मिटकरी यांनी तेव्हाही इतकीच कठोर भूमिका घेतली असती का? की मग केंद्रीय लोकसेवा आयोगालाच बदनाम करून नेमणूक प्रक्रियेवर चिखलफेक केली असती?

त्यामुळे अजित पवारांची राजकीय दादागिरी आणि अमोल मिटकरींची नौटंकी यापुढे पोलीस अधिकाऱ्यांना झुकवू शकत नाहीत; उलट या दादांच्या उघड बेमालूम कारभारामुळे त्यांची राजकीय फजीतीच होत आहे. असा निष्कर्षच संपूर्ण महाराष्ट्रातील जनसामान्यांकडून काढल्या जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish