खाजगी शाळा बनल्या आर्थिक, मानसिक व शारीरिक फसवणुकीचा अड्डा..
Chanchal pitambarwale 6 Feb 2025
अकोट शहरातील नामांकित असलेले सरस्वती विद्यालय येथील मुख्याध्यापक भूषण ठाकूर यांने एका महिला शिक्षिकेचे शारीरिक शोषण करण्याचा प्रयत्न केला तसा अकोट शहर पोलीस स्टेशनला गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे सध्या आरोपी असलेला भूषण ठाकूर हा जामीनावर बाहेर आहे सोबतच गर्ल्स उर्दू हायस्कूल येथील शिक्षक नाझीर उल्ला पटेल याने सुद्धा एका बेरोजगार युवकाची दहा लाखांनी आर्थिक फसवणूक केली आणि जवळपास सर्वच शाळांमध्ये जातिवाद सुरू असून अनुसूचित जमातीच्या शिक्षकांना मानसिक त्रास देऊन सावत्र वागणूक देण्याचा प्रकार सर्वश्रुत आहे..

शिक्षणाधिकारी यांच्याकडूनच शासनाच्या आदेशाची पायमल्ली..
सुचिता पाटेकर यांनी दिले मुख्याध्यापकाला विशेष अधिकार..
आरोपी शिक्षक नाझीर उल्ला पटेल चे निलंबन कधी ?
अकोट : मधील शिक्षण व्यवस्था ही चारही बाजूने भ्रष्टाचाराने माखलेली आहे अनेक शाळांचे भोंगळ कारभार चव्हाट्यावर सत्य लढा ने आणले आहे शहरातील नामांकित असलेले गर्ल्स उर्दू हायस्कूल येथील शिक्षक नाझीर उल्ला पटेल हे फसवणुकीच्या गुन्ह्यामधील आरोपी असून आज रोजी जामिनावर बाहेर आहे 2019 मध्ये एका बेरोजगार तरुणाला नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवून तब्बल दहा लाखाची फसवणूक नाझीर उल्ला पटेल याने केली होती त्यामध्ये जवळपास 18 ते 20 दिवस सेंट्रल जेलमध्ये पटेल याला काढावे लागले होते तरीसुद्धा शासनाच्या नियमानुसार नाझीर उल्ला पटेल हा निलंबित झाला नाही याचे मात्र आश्चर्य व्यक्त होत आहे
उलट शाळेत कायमस्वरूपी गैरहजर असून सुद्धा नाझिर उल्ला पटेल हा नियमित वेतन घेत आहे त्यामुळे अकोट पोलिसांच्या ताब्यात सात दिवस व सेंट्रल जेलमध्ये बारा दिवस असून सुद्धा संपूर्ण वेतन घेतल्याचा संशय बळावला आहे जेलमध्ये राहून नाझीर उल्ला पटेलचे निलंबन नाही सतत गैरहजर असून सुद्धा मस्टरवर सह्या केल्या जातात सोबतच संपूर्ण वेतन सुद्धा दिले जाते आणि हा सर्व प्रकार व माहिती माहिती अधिकार अंतर्गत शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांना विचारली असता गर्ल्स उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापकालाच नाझीर उल्ला पटेल यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश पाटेकर यांनी दिले त्यामुळे सुचिता पाटेकर यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे शासनाची फसवणूक पटेल हा कर्तव्यावर सतत गैरहजर असून सुद्धा वेतन काढण्याचे काम मुख्यध्यापकानेच केले आहे शासनाची दिशाभूल हे मुख्याध्यापकानेच केली आहे त्यामुळे नाझीर उल्ला पटेल प्रमाणेच मुख्याध्यापक सुद्धा या फसवणुकीला जबाबदार आहे सोबतच पटेल याला शिक्षणाधिकारी यांच्याकडून निलंबित करण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांच्यावर सुद्धा संशय व्यक्त होत आहे
त्यामुळे नाझीर उल्ला पटेल याला निलंबित कोण करणार ? निलंबित करण्याचे अधिकार कुणाला ? शासनाची दिशाभूल करून लाखो रुपयांची फसवणूक मुख्याध्यापकाच्या संगणमताने पटेल कडून होत आहे तरीसुद्धा शिक्षणाधिकारी जाणीवपूर्वक डोळेझाक का करीत असून फक्त पदावर नाममात्र आहेत का ? सुचिता पाटेकर खरोखरच अनभिज्ञ आहेत की आर्थिक हितसंबंध जोपासण्याचे काम सुरू आहे असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे.