सरस्वती शाळेत वर्ग खोल्यांमध्ये कचरा आणि धुळीचे साम्राज्य.! विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात..
Chanchal pitambarwale 5 Feb 2025
विनयभंग गुन्ह्यातील आरोपी व सध्या जामिनावर बाहेर असलेला मुख्याध्यापक भूषण ठाकूर सर्व शिक्षकांच्या पगारातून एक टक्का वसूल करतो तो कशासाठी ? शासन तीन चतुर्थश्रेणी चपराशी यांना वेतन देते ते कशासाठी ? विद्यार्थ्यांचे आरोग्य व भविष्य वाऱ्यावर सोडून या शाळेतील प्रत्येक घटक फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ साध्य करीत असल्याचे स्पष्ट होत आहे..
सत्य लढाच्या बातमीमुळे मुख्याध्यापकाला आली जाग
सरस्वती शाळेतील आणखी अनेक गैरप्रकार उघड
अध्यक्षांना डावलून मुख्याध्यापक भूषण ठाकूरची मनमानी
अकोट: मधील खाजगी शाळांना झाले तरी काय वरून गोगलगाय आणि आतून पोटात पाय अशी परिस्थिती झाली आहे सरस्वती विद्यालयाचा भोंगळ कारभार हा इतका खोलात आहे की व्यवस्थापनाच्या वादामध्ये आरोपी असलेला मुख्याध्यापक भूषण ठाकूर हा मात्र पुरेपूर या वादाचा फायदा घेत आहे स्वतःला शाळेचा सर्वेसर्वा समजून हुकूमशाही पद्धतीने शाळेत मनमानी कारभार करीत आहे

समाज कल्याण विभाग अकोला यांच्याकडून अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती च्या प्रस्तावाकरिता मुख्याध्यापक भूषण ठाकूरला अकरा वेळा स्मरणपत्र देऊन सुद्धा ठाकूर ने सर्व पत्रांना केराची टोपली दाखवली परंतु सत्य लढा ने या प्रकरणाची दखल घेऊन 12 जानेवारीला हे वृत्त प्रसारित केले होते त्यामुळे तात्काळ मुख्याध्यापक ठाकूर यांनी दुसऱ्याच दिवशी सात विद्यार्थ्यांचे प्रस्ताव दाखल केले यावरून मुख्याध्यापक ठाकूर हे कर्तव्यप्रती गंभीर नसल्याचे दिसून येते अन्यथा गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पासून वंचित ठेवण्याचे कटकारस्थान वारंवार ठाकूर कडून रचल्या जात असल्याचे बोलले जाते
तसेच सरस्वती विद्यालय येथे तीन चतुर्थ श्रेणी चपराशी असून सुद्धा वर्ग खोल्या सफाई केल्या जात नसल्याची पालकांकडून नियमित ओरड आहे फक्त आठवड्यातून एकदाच ह्या वर्ग खोल्या सफाई केल्या जातात त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर सुद्धा खूप मोठा वाईट परिणाम होत आहे

त्याचप्रमाणे बाथरूमची अवस्था सुद्धा वाईट आहे विद्यार्थिनीसह महिला शिक्षकांना सुद्धा दुर्गंधीमुळे आरोग्य विषयक समस्या सुरू झाल्या आहेत त्यामध्ये शिक्षक राजेश बरेठीये हे दोन महिन्यापासून रिटायर्ड झालेले आहेत व त्यापूर्वी सुद्धा दोन महिने सतत गैरहजर असल्यामुळे मागील चार महिन्यापासून गणित व विज्ञान अतिशय महत्त्वाचे विषय तासिका झाल्याच नाहीत त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित असून ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांसमोर गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे मुख्याध्यापक भूषण ठाकूर हे शाळेतील अंतर्गत राजकारणामध्ये एवढे गुरफटून गेले आहेत की विद्यार्थ्यांच्या भविष्याकरिता कोणतीही पाऊले उचलताना दिसत नाहीत गॅदरिंग नाही, सहली नाही कोणतेच विशेष उपक्रम नाहीत तसेच मागील दोन वर्षापासून प्रथम सत्रांत परीक्षेचा निकाल सुद्धा विद्यार्थ्यांना देऊ शकले नाही त्यामुळे भूषण ठाकूर मुख्याध्यापक म्हणून सपशेल अयशस्वी ठरले असून सरस्वती विद्यालयाचे भविष्य अंधारात असल्याचे बोलले जात आहे
प्रतिक्रिया
2022- 23 वर्षातील अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती प्रस्ताव सरस्वती विद्यालयाकडून 12 जानेवारीपर्यंत दाखल केले नव्हते परंतु त्यानंतर तात्काळ सात विद्यार्थ्यांचे प्रस्ताव तडकाफडकी सरस्वती विद्यालयाकडून दाखल करण्यात आल्याची माहिती आहे..

मधुकर सूर्यवंशी
गटशिक्षणाधिकारी अकोट
प्रतिक्रिया
यावर्षी शाळेतील तुकड्या कमी होण्याची शक्यता आहे पटसंख्या कायम ठेवण्यासाठी सर्व शिक्षक मेहनत करीत असतात परंतु यावर्षी तुकड्या कमी झाल्यास अनेक शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची टांगती तलवार कायम आहे विद्यार्थ्याप्रमाणेच शिक्षकांचे भविष्य सुद्धा यापुढे अंधारात बुडणार हे निश्चित?

रूपाली सोळंके
शिक्षिका,सरस्वती विद्यालय अकोट