उत्तमराव वानकर यांचा सेवानिवृत्ती कृतज्ञ सत्कार समारंभ संपन्न..नवीन पिढीला दिशा देणारा संस्कारदर्शक आदर्श उपक्रम – गजेंद्र पाचडे
असेगाव बाजार : येथील पोस्टमन श्री उत्तमराव वानकर यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल कृतज्ञ सत्कार समारंभ नुकताच हनुमान मंदिरामध्ये पार पडला..
RaviRaj 23 March 2024
पोस्टमन उत्तमराव वानकर यांचा सत्कार करताना सेवा समिती आसेगाव बाजार
श्री ज्ञानेश्वरी पारायण सेवा समिती हनुमान मंदिर आसेगाव बाजार यांच्या वतीने श्री उत्तमराव वानकर यांचा सत्कार सेवा समितीचे जेष्ठ मार्गदर्शक श्री नानाभाऊ सावरकर यांच्या शुभहस्ते सत्कार पार पडला श्री उत्तमराव वानकर यांनी आसेगाव बाजार येथील लोकांची 42 वर्ष अविरत सेवा केली त्याबद्दल संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला..यावेळी सेवा समितीचे दामोदरपंत उगले, मनोहरराव शिराळकर, संजय पाचडे, विठ्ठल पाचडे, अजबराव दराडे, गणेशराव नारे ,गजेंद्र पाचडे ,अरुण टेकाडे, दिलीप वालकडे ,श्रीकृष्ण शिवरकर, विश्वासराव पाचडे, गजानन मालटे, अमोल पाचडे, विठ्ठल देशमुख, मोहन नारे, दत्ता मोरे ,दीपक पुनकर, वैभव टेकाडे, गजानन उगले, मनोज पाचडे ,अक्षय टेकाडे, सोपान पंडित ,दिनेश नारे, सागर पंडित, यांच्यासह सर्व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
अशा विशेष कार्यक्रमाची संकल्पना ही नवीन पिढीला दिशा देणारी असून या उपक्रमांच्या माध्यमातून गावातील सर्व सन्माननीय मंडळींमध्ये हितसंबंध जोपासण्याचे प्रयत्न गजेंद्र पाचडे यांच्या पुढाकाराने नेहमीच होत असते तसेच विशेष व उत्कृष्ट अशी मनाला आनंद देणारी संकल्पना राबवून गावकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचे काम गजेंद्र पाचडे यांच्याकडून सतत होताना दिसते..
आपल्या आयुष्यातील 42 वर्षे पोस्टमन म्हणून अविरत सेवा देणारे उत्तमराव वानकर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा योग्य सन्मान केल्याबद्दल वानकर यांनी सर्व सन्माननीय गावकरी मंडळी तसेच सेवा समिती व गजेंद्र पाचडे यांचे विशेष आभार मानले..