विजय पोहनकर यांचा वंचित मध्ये प्रवेश-जळगाव विधानसभा उमेदवारांचे धाबे दणाणले..
अकोला:- भारिप-बमस ने अकोला पॅटर्न राबवून सोशल इंजिनिअरिंग चा नवा फॉर्म्युला देशाला दिला होता, आजही वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर हाच फॉर्म्युला राज्यात वापरतांना दिसतात.आज दिनांक 19 जाने 24 ला अकोला येथे यशवंत भवन मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील जळगांव (जामोद) मतदारसंघात सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार म्हणून आपली कार्य ओळख निर्माण करणारे बारा बलुतेदार समाजाचे गाढे अभ्यासक तथा बारा बलुतेदार महासंघाचे राज्य मुख्यप्रवक्ता,माजी महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे राज्य चिटणीस,चित्रपट लेखक/दिग्दर्शक/निर्माता विजय पोहनकर ह्यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन जाहीर प्रवेश करण्यात आला.मुख्यतः या वेळी सौ.किरण हरिभाऊ लंगोटे प्रवासी रेल्वे संघाच्या राज्य उपाध्यक्ष,राष्ट्रीय मानव आयोगाच्या सौ.ज्योतीताई बावसकर, तथा शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष श्रीमती रजनी राठोड ह्यांनी प्रवेश केला. विशेषतः ह्या प्रवेशा वेळी आदिवासी बांधव मोठ्या संखने होते. ग्राम.कवठलं ता.संग्रामपूर चे माजी सरपंच ओंकार राव लंगोटे, वडशिंगी ग्रामपंचायत सदस्य गणेश डंबरे, श्रीकृष्ण कावरे,नितीन भगत ह्या तीन सदस्यांनी प्रवेश केला सोबत वडशिंगी येथील प्रकाश सातव,अनंता राजूरकर,डिगंबर अंबुलकर,अंबादास सातव,मंगेश खंडारे, कैलास भगत पिंपळगाव (काळे)येथील संदीप तायडे,हरी तायडे,पूर्णाजी मोंडोकार, किसना मोंडोकार, गुलाबराव पाटील, रमेश बैरागी,भगवान ढगे टूनकी येथील मुन्नाभाई जयस्वाल, गणेश डिगे खेर्डा येथील सुखदेव बापट, सुभाष मदनकार, नंदकिशोर वसतकार, सेवानिवृत्त पोलीस विजय तायडे गणेश काळसकर,अमोल मदनकार,हाडियामाल,शिवानी वासाली येथील आदिवासी बांधवानी विजय पोहनकर ह्यांच्या सोबत जाहीर प्रवेश केला.
बाळासाहेब आंबेडकर हेच महाराष्ट्र राज्यातील बारा बलुतेदार अठरा आलुतेदार, मायक्रो ओबीसी ह्यांना न्याय देऊ शकतात असे सांगत विजय पोहनकर ह्यांनी राज्यतील बलुतेदार ह्यांची राजकीय व्यथा मांडली. पक्षाने आदेश केल्यास संपूर्ण महाराष्ट्रात फिरून बारा बलुतेदार हा 185 मतदारसंघात निर्णयाक मतदार आहे.गेल्या 75 वर्षात हा वर्ग फक्त आणि फक्त मतदानापुरात सर्वच राजकीय पक्षाने वापरला व निरंतर फेकून दिला।.आजपर्यंत ह्या बलुतेदार वर्गाला कोणतेच राजकीय सत्तेची पदे मिळाली नाहीत.खऱ्या अर्थाने राजकीय वंचित असलेला हा समाज विजय पोहनकारांच्या प्रवेशाचे जागृत होईल अशीच खमंग चर्चा अकोला येथे सुरू होती. विजय पोहनकर ह्यांचा राजकीय अभ्यास,बारा बलुतेदार वर्गातील लोकांबद्दल चे अभ्यासपूर्ण प्रेम बघून बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतः त्यांच्याशी चर्चा करून हा प्रवेश दिला.ह्या प्रवेशकरिता वंचित चे नेते बालमुकुंद भिरड ह्यानी आपले कसब पणाला लावत विजय पोहनकर यांचा वंचित मध्ये प्रवेश निश्चित केला आहे.. भविष्यात जळगाव जामोद मतदार संघात विजय पोहनकर यांना वंचित ने मैदानात उतरवल्यास अक्षरशः भाजपाला नाकीनऊ येतील अशी कुजबुज या आजच्या राजकीय प्रवेशामुळे सुरू झाली असून जळगाव भाजपचे धाबे दणाणले आहे.. येणाऱ्या काळात जळगाव मध्ये राजकीय भूकंप निश्चित होईल असे अनेक राजकीय तज्ञांनी मत व्यक्त केले आहे…