वरली बहाद्दर पत्रकाराकडून शासकीय कार्यालयात घुसून नायब तहसीलदाराला जीवे मारण्याची धमकी..
हा सर्व गंभीर प्रकार घडत असताना वेळोवेळी सिटी न्यूज सुपरफास्ट चे संचालक यांना राजेश साळुंके याच्या घातक पार्श्वभूमी ची माहिती एका जबाबदार पत्रकाराने प्रत्यक्ष भेटून दिली होती राजेश साळुंके वर देशद्रोहाचे गुन्हे दाखल असून भविष्यात हा वरली बहाद्दर पत्रकार सिटी न्यूज सुपरफास्ट या दैनिकाच्या नावाचा गैरवापर करून अतिरेक करेल याचीसुद्धा माहिती संचालकाला देण्यात आली होती परंतु दैनिकाचे संचालक यांनी जाणीवपूर्वक या सर्व गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करीत अनभिज्ञ राहून एक प्रकारे या घातक प्रवृत्तीला प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे यामागे सिटी न्यूज सुपरफास्ट दैनिकाच्या संचालकाचा कोणता उद्देश असावा ! याबाबतीत मात्र संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकच चर्चा रंगली असून जनमानसात संभ्रम निर्माण झालेला आहे
salim khan 22 May 2025

वरली बहाद्दर पत्रकारावर सिटी न्यूज सुपरफास्ट मेहरबान..
थेट नायब तहसीलदाराला शासकीय कार्यालयात जाऊन जीवे मारण्याची धमकी..
वरली बहाद्दर पत्रकार राजेश साळुंके वर वारंवार गंभीर गुन्हे दाखल..
अकोट: सारख्या संवेदनशील शहरात सिटी न्यूज सुपरफास्ट दैनिकांच्या वरली बहाद्दर पत्रकाराने धुमाकूळ घातलेला आहे राजकीय दबाव व पोलीस प्रशासनाचा वापर करून हा वरली बहाद्दर पत्रकार मनमानी करीत कुख्यात गुंडांना हाताशी धरून शहरांमध्ये दहशत निर्माण करीत आहे काही दिवसापूर्वीच वरली बहाद्दर राजेश साळुंके सह शिंदे गटाचे शिवसेना अकोला उपजिल्हाप्रमुख मनिष रामाभाऊ कराळे, महादेव भगत,सागर कराळे व इतर चार वरली बहाद्दरानी दबंग पत्रकार रविराज मोरे यांच्यावर प्राण घातक हल्ला केला होता यादरम्यान तात्काळ मोरे यांनी अकोट शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली त्यामध्ये भारतीय न्याय संहिता 2023 नुसार 115(2)118(1)351(2)189(2)191(3)190 वरील सर्व आठ आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत परंतु पोलीस प्रशासनाने वरली बहाद्दर आरोपींना पाठीशी घालून पुन्हा शहरात दादागिरी करून दहशत माजवण्यासाठी मोकाट सोडले आहे त्यामुळे रविराज मोरे सारख्या बेधडक लिखाण करणाऱ्या पत्रकाराचा आवाज दाबण्यासाठी प्राणघातक हल्ला केल्यामुळे राजेश साळुंके याची हिम्मत अजूनच वाढली आहे ही घटना ताजी असतानाच पुन्हा राजेश साळुंके याने नायब तहसीलदार सुधीर थेटे यांना 13 मे रोजी शासकीय कार्यालयात जाऊन जीवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार नायब तहसीलदार थेटे यांनी अकोट शहर पोलीस स्टेशनला दाखल केली असून यामध्ये सुद्धा वरली बहाद्दर पत्रकार राजेश साळुंके याच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 नुसार 221 व 224 असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत नायब तहसीलदार सारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर वरली बहाद्दर असलेला पत्रकार जीवे मारण्याची धमकी देतो तसेच पत्रकार रविराज मोरे यांच्यावर प्राण घातक हल्ला करतो ,2005 व 2007 मध्ये याच वरली बहाद्दर राजेश साळुंके विरुद्ध नकली नोटा छापून चलनात आणल्याचा ठपका ठेवत अकोट पोलीस स्टेशनला देशद्रोहासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याचा एफ आय आर क्रमांक 183/2005 व 3138/2007 आहे तरीसुद्धा पोलीस प्रशासन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी या देशद्रोहीला पाठीशी घालत आहेत सोबतच अशा कुख्यात गुन्हेगाराला सिटी न्यूज सुपरफास्ट चे संचालक प्रोत्साहन देत असून त्याला विशेष प्रतिनिधी म्हणून दादागिरी करून दहशत माजवण्याची मूकसंमती दिल्याचे निदर्शनास येत आहे राजेश साळुंके सारख्या घातक प्रवृत्तीला सिटी न्यूज सुपरफास्ट कडून प्रोत्साहन कशासाठी ? नायब तहसीलदार यांना जिवे मारण्याची धमकी देण्यापर्यंत वरली बहाद्दर पत्रकाराची मजल गेली तरीही नामांकित असलेले सिटी न्यूज सुपरफास्ट चे संचालक डोळे झाक का करीत आहेत ? नकली नोटा छापून चलनात आणणारा साळुंके याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असून या कुख्यात आरोपीला संरक्षण देण्यामागे सिटी न्यूज सुपरफास्ट चा कोणता उद्देश असावा अशी जोरदार चर्चा या माध्यमातून सर्वत्र सुरू झाली आहे

सोमवार दि. 19 मे रोजी सिटी न्यूज सुपरफास्ट या दैनिकांमध्ये राजेश साळुंके विशेष प्रतिनिधी अकोट असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे त्या संदर्भातील जाहिरात मिळवण्यासाठी प्रकाशित केलेला फोटो वरील प्रमाणे
प्रतिक्रिया
सदर तक्रारीमध्ये सिटी न्यूज सुपरफास्ट या दैनिकाचा पत्रकार राजेश साळुंके याचा स्पष्ट उल्लेख असल्यामुळे नायब तहसीलदार सारख्या जबाबदार अधिकाऱ्याला शासकीय कार्यालयात घुसून जीवे मारण्याची धमकी देणे ही बाब गंभीर आहे याची तात्काळ दाखल अकोला पोलीस व सिटी न्यूज सुपरफास्ट या दैनिकाच्या संपादकांनी घेणे गरजेचे आहे हा साळुंके नामक पत्रकार पदाचा गैरवापर करीत असल्याचे नमूद तक्रारी वरून स्पष्ट होते तसेच राजेश साळुंके याची ओळख सिटी न्यूज सुपरफास्ट या दैनिकाचा विशेष प्रतिनिधी म्हणून सदर तक्रारीच्या मजकुरावरून दिसून येते त्यामुळे दैनिकाच्या नावासह राजेश साळुंके याच्यावर गुन्हे दाखल झाल्याची बातमी प्रकाशित केली असता यामध्ये कोणतेही वावगे ठरणार नाही
अॅड जुबेर अहमद, वरिष्ठ विधीज्ञ
उच्च न्यायालय नागपूर

प्रतिक्रिया
अकोट येथे नायब तहसीलदार म्हणून मी डिसेंबर 2024 ला रुजू झालो त्यावेळी संजय गांधी निराधार योजना मधील अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित होते परंतु मी ठिकठिकाणी कॅम्प घेऊन आज रोजी जवळपास ९५ टक्क्यापर्यंत लाभार्थ्यांना लाभ देण्याचे काम केले आहे व सर्व लाभार्थी समाधानी असल्याचे दिसून येते पण कोणतेही कारण नसताना मला जीवे मारण्याची धमकी देऊन राजेश साळुंके सारख्या वरली बहाद्दर पत्रकाराला नामांकित असलेले सिटी न्यूज सुपरफास्ट दैनिक हे प्रोत्साहन देत आहे याची मात्र खंत वाटत आहे
सुधीर थेटे नायब तहसीलदार अकोट