अकोट: येथील वरिष्ठ पत्रकार विजय शिंदे यांचा अकोला जिल्हा पत्रकार संघाकडून सत्कार-जिल्हाधिकारी निमाअरोरासह अनेकांची उपस्थिती..
RaviRaj 8 July 2023

अकोट : येथील वरिष्ठ पत्रकार, जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस “विजय शिंदे” यांनी “नितीमत्ता मुल्ये व आध्यात्मिक शिक्षण” या विषयात प्रथमश्रेणीत पदवी घेतल्याबद्दल अकोला जिल्हा पत्रकार संघाचे वतीने आयोजित गुणगौरव सोहळ्यात सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हाशिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार,महावितरणचे पीआरओ राठोड, मराठी पत्रकार परिषदचे मा.राज्याध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शौकतअली मिरसाहेब, सरचिटणीस प्रमोद लाजुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती..