नंदू राणे यांची जाकीर शाह रशीद शाह विरुद्ध गंभीर तक्रार असूनही दहीहंडा पोलिस गुन्हे दाखल करण्यास असमर्थ! “पोलिसांवर कुणाचा दबाव- भाजप ” एम आय एम की काँग्रेस..
Sagar Lohiya 29 Dec 2022
अकोट : मधील दंगल प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला जाकीर शाह रशीद शाह यांने चोहोट्टा बाजार येथील प्रतिष्ठित व्यावसायिक नंदू राणे यांना अकोट मध्ये आल्यास जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार दहीहंडा पोलिसांना दि.२६ ऑक्टोबर २०२२ रोजी नंदू राणे यांनी दिली परंतु एवढी गंभीर तक्रार असूनही दहीहंडा पोलिसांकडून जाकीर शाह रशीद शाह याच्यावर गुन्हे दाखल झाले नाहीत. कदाचित जाकीर शाह हा स्वतः माजी मंत्री पंकजा मुंडे माझी मानलेली बहीण आहे असे जाहीरपणे सांगत फिरतो
तसेच मागील काळात जाकीर शाह भाजपामध्ये सक्रिय असल्यामुळे भाजपच्या दबावाखाली दहीहंडा पोलीस आहेत का? तसेच अकोट मधील दंगल प्रकरणांमध्ये मुख्य आरोपी म्हणून सामील असलेला जाकीर शाह रशीद शाह हा एम आय एम पक्षामध्ये सक्रिय होता परंतु आज रोजी जाकीर शाह हा काँग्रेसमध्ये सक्रिय असल्यामुळे जाकीर शाहला कारवाई पासून वाचवण्याकरिता कोणत्या पक्षाची ताकद मिळत आहे कोणत्या पक्षाच्या दबावाखाली पोलीस जाकीर शाहवर गुन्हे दाखल करण्यास असमर्थ आहेत? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून जाकीर शाह विरुद्ध अनेक निराधार गरीब महिलांना फसवणुकीच्या तक्रारी अकोट पोलीस स्टेशन व इतर ठिकाणी सुद्धा झालेल्या आहेत त्यामुळे सर्व तक्रारदारांमध्ये खूप मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. गेली दोन महिन्यापासून एवढ्या मोठ्या कुख्यात असलेल्या आरोपीला अकोला पोलीस प्रशासन पाठीशी का घालत आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून न्याय व हक्कासाठी आता फक्त अकोला पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याची वेळ तक्रारदारावर आली आहे.असे आवाहन नंदू राणे व अनेक पीडित महिला यांनी केले आहे.