‘अडीच वर्ष सत्तेचा मलिदा चाखणारे…’, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर पलटवार
मुख्यमंत्र्यांशी बोलताना एकनाथ शिंदे भावुक झाल्याचीही माहिती आहे. भाजपसोबत जुळवून घ्या, असंही शिंदे मुख्यमंत्र्यांशी बोलतना म्हणाले. मी 24 तासांमध्ये इतका वाईट झालो का? माझ्याविरोधात घोषणाबाजी केली जात आहे. माझे पुतळे जाळले जात आहेत. मी कोणालाही शब्द दिला नाही. मी कोणत्याही पेपरवर सही केलेली नाही. मी पक्षासाठी हे करतोय, असं एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलताना म्हणाले.