डॉ.रणजित पाटलांच्या बेरोजगार भत्त्याचं कायं झालं – प्रा.प्रविण बोंद्रे यांचा थेट सवाल ! सत्ताधारी पदवीधारकांचा करतात फक्त मतदानासाठी वापर..
ललित नगराळे 10 Jan 2023
अकोट :
अमरावती पदवीधर मतदारसंघातून पदवीधारकांचा प्रतिनिधी हा विधानपरिषदेवर निवडून दिला जातो.मागील दोन टर्मपासून १२ वर्षांपासून डाॅ.रणजित पाटील हे पदवीधारकांचे प्रतिनिधी आहेत.पाटलांनी मागील निवडणुकीत पदवीधर बेरोजगारांना ६०० रुपये बेरोजगार भत्ता देणार असे जाहिर केले होते.परंतू पूर्ण काळ संपला तरी देखील एक रुपया देखील कोणत्या पदवीधर बेरोजगारांना मिळाले नाही.यावरुन सत्ताधारी हे फक्त पदवीधारकांचा उपयोग करुन घेत आहेत.पदवीधर ३० जानेवारीला होणाऱ्या निवडणूकीत सत्ताधाऱ्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.पदवीधर,पदव्युत्तर पर्यंतचे शिक्षण घेणारे विद्यार्थी,विद्यार्थीनी मोठ्या आशाआकांक्षाने रोजगार मिळावा,नोकरी मिळावी यासाठी ते सातत्याने अभ्यास करत असतात.रोजगारासाठी ठिकठिकाणी अर्ज करत असतात.पदवीधारक हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त करतो.परंतू पदवीधर हा फक्त पदवीधारकांचा प्रतिनिधी म्हणून आमदार निवडून देण्यापुरतेच मर्यादित राहिले आहेत.पदवी ही वेगवेगळ्या क्षेत्रातून घेतली जाते.त्यामध्ये कला, वाणिज्य,विज्ञान,इंजिनिअर,डॉक्टर,
वकिल यांसारख्या क्षेत्रातून विद्यार्थी, विद्यार्थीनी ह्या पदव्या प्राप्त करीत असतात.पदव्या ह्या फक्त नावालाचं राहिल्या आहेत.त्यामुळे अमरावती पदवीधर मतदारसंघातील पदवीधर सूज्ञ झाला आहे.यावेळी पदवीधर योग्य निर्णय घेण्याच्या प्रयत्नात आहेत.बेरोजगारांचा बेरोजगारी भत्त्याच्या मुद्द्याचा आवाज विधानपरिषदेत नविन पदवीधर आमदारांकडून मांडला जावा याची आशा आहे.