नाझीर उल्ला पटेल ला निलंबित करा अन्यथा शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण..
Chanchal pitambarwale 20 January 2025
नाझीर उल्ला पटेल समोर शिक्षण व्यवस्था हतबल
जि प उर्दू शाळेतील आणखी एक गंभीर प्रकार उघड
अकोट तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेला झाले तरी काय गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, उपसंचालक तथा संचालक हे शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक यांच्यासमोर हतबल का आहेत? गर्ल्स उर्दू हायस्कूल अकोट येथील शिक्षक नाझीर उल्ला पटेल यांच्यावर नोकरी लावून देण्याचे आमीष दाखवून दहा लाखाची फसवणूक केल्याचे गंभीर गुन्हे दाखल असून त्यामध्ये जवळपास पटेल यांनी 18 दिवस सेंट्रल जेल ची हवा सुद्धा खाल्ली तरीसुद्धा नियमित पगाराची नोकरी कायम सुरू असल्याची गंभीर बाब निदर्शनास आली नाझिर उल्ला पटेल यांना निलंबित करण्यासाठी शिक्षण व्यवस्थेमधील अधिकारी हतबल झालेले आहेत. त्यामध्ये ही हतबलता आर्थिक हितसंबंध जोपासण्याची की राजकीय दबावतंत्र नेमकी कशाची आहे याचा मात्र शोध घेणे गरजेचे आहे
तसेच मोहाळा येथील जि प उर्दू शाळेमधील महिला शिक्षिका 2001 नियुक्ती पासून आजपर्यंत तब्बल 24 वर्षापासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्याचा गंभीर प्रकार शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून उघडकीस आला आहे
ही महिला शिक्षिका एका राजकीय घराण्यातील असल्यामुळे मागील 24 वर्षापासून बदली होत नसल्याची चर्चा रंगलेली आहे
मोहाळा येथील महत्त्वाचा हिंदू स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे सातबारा नुसार वीस गुंठे जागा हिंदू स्मशानभूमी करिता राखीव असून सुद्धा त्या जागेवरही अतिक्रमण करून पिक उत्पादन घेतल्या जात असल्याचे बोलले जाते त्याचप्रमाणे संपूर्ण गावात गैर कायदेशीर व अमर्यादित अतिक्रमण होऊन स्थानिक ग्रामपंचायतीनेच प्रोत्साहन दिल्याचे वृत्त आहे ग्रामपंचायत मधील सदस्यांच्या पाच वर्षाचा कार्यकाल संपत आला असून सुद्धा 2020 मध्ये जिंकून आलेल्या सदस्यांचे अजूनही जात वैधता प्रमाणपत्र दाखल झालेले नाही असे अनेक गैरप्रकार नझिर उल्ला पटेल यांच्या माध्यमातून बाहेर येत आहेत त्यामुळे सर्वच शासकीय यंत्रणांनी सजग होऊन तात्काळ मोहाळा या गावातील होत असलेल्या सर्व गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी वरिष्ठांनी दखल घ्यावी अन्यथा पुढील काळात जनसामान्यांचे जगणे मुश्किल होऊन जाईल अशा भावना जनसामान्यांच्या उमटत असून शिक्षक नाझीर उल्ला पटेल यांना तात्काळ निलंबित करा अन्यथा अन्यायग्रस्त अब्दुल अन्सार यांनी शिक्षणाधिकारी अकोला यांच्या कार्यालयासमोर संपूर्ण परिवारासह आमरण उपोषण करणार असल्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे