अखेर गर्ल्स उर्दू हायस्कूल वर कार्यवाही होणार.. नाझिर उल्ला पटेल मुळे संपूर्ण शाळेचे होणार नुकसान..
RaviRaj 17 Feb 2025
अखेर आकोट येथील गर्ल्स उर्दू हायस्कूल मधील गैर कारभार हा वारंवार पत्रकार रविराज मोरे यांनी जनतेसमोर आणल्यामुळे गर्ल्स उर्दू हायस्कूल वर कार्यवाही होणार..
शिक्षकांना मानसिक त्रास देण्याप्रकरणी अकोला जिल्ह्यातील अकोट येथील उर्दू गर्ल्स हायस्कूल आणि बॉईज उर्दू स्कूलच्या व्यवस्थापनावर कारवाई करण्याचा गंभीर इशारा महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी दिला. नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानी या शाळेच्या शिक्षक आणि संचालकांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली
या बैठकीदरम्यान महिला शिक्षकांनी व्यवस्थापनावर मानसिक त्रास, नियुक्त्यांमध्ये गैरव्यवहार आणि पैशांची अवैध मागणी यासारखे गंभीर आरोप केले. महिला शिक्षकांशी सातत्याने दुर्व्यवहार केला जातो, तसेच नियुक्तीसाठी शारीरिक छळ आणि लाखो रुपयांची मागणी केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. अनेक शिक्षक वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे सेवा देत असतानाही, संचालक आपल्या जवळच्या नातेवाईकांची नियुक्ती करत आहेत, असे शिक्षकांनी सांगितले
परंतु या महिलांच्या भावना शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर स्वतः एक महिला असून सुद्धा समजून घेतल्या नाहीत अशा या निगरगट्ट व निर्दयी शिक्षणाधिकारी यांची तात्काळ शासनाने उचलबांगडी करावी अशी मागणी संपूर्ण जिल्ह्याच्या शिक्षक वर्गातून होत आहे

शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांचे खोलात पाय
नाझीर उल्ला पटेल ला निलंबित न करता वाचवण्याचा प्रयत्न
पाटेकर कडून शासनाची दिशाभूल करीत मनमानी..
गेल्या महिन्याभरापासून गर्ल्स उर्दू हायस्कूलचे शिक्षक नाझीर उल्ला पटेल यांचे निलंबन व्हावे याकरिता अनेक तक्रारी शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांच्याकडे झाल्या आहेत त्याप्रमाणे पाटेकर यांनी तात्काळ नाझिर उल्ला पटेल या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करणे अपेक्षित होते परंतु स्वतःच्या अधिकाराचा वापर न करता गर्ल्स उर्दू हायस्कूलच्या वादग्रस्त असलेल्या मुख्याध्यापकालाच या प्रकरणाची माहिती तक्रारदाराला देण्याचे निर्देश केले नाझीर उल्ला पटेल हा 2019 मध्ये 420 च्या गंभीर गुन्ह्यामध्ये वीस दिवस जेलमध्ये राहिला होता त्यामुळे नियमानुसार पटेल याला निलंबित करणे गरजेचे होते परंतु शिक्षणाधिकारी यांनी नाझीर उल्ला पटेल याला निलंबित केले नाही उलट 2019 पासून तर आजपर्यंत संपूर्ण पगार पटेल याला देण्यात येत आहे गर्ल्स उर्दू हायस्कूल चा व्यवस्थापनाचा वाद हा मागील 35 वर्षापासून न्यायालयात सुरू आहे सोबतच मुख्याध्यापकाचा सुद्धा वाद हा न्यायालयात सुरू आहे त्यावर मुख्याध्यापकाला फक्त इतर शिक्षकांचे पगार थांबू नये त्याकरिता सही मारण्याचा तात्पुरता अधिकार शिक्षणाधिकारी यांच्याकडून देण्यात आला होता परंतु नझिर उल्ला पटेल याला निलंबित करण्याचा अधिकार हा शिक्षणाधिकारी यांना असून या अधिकाराचा वापर सुचिता पाटेकर जाणीवपूर्वक करीत नाहीत व मुख्याध्यापक यांच्या संगणमताने वेळकाढूपणा सुरू आहे थेट या प्रकरणाची चौकशी करून निलंबनाची कारवाई न करता थोड्याशा आर्थिक फायद्यासाठी शासनाची दिशाभूल करून जनतेच्या पैशाचा अपव्यय सुरू आहे सुचिता पाटेकर यांचा कार्यकाळ हा वादग्रस्त राहिलेला असून कुणालाही जुमानत नसल्याचा इतिहास आहे त्यामुळे शासनाच्या पैशाची उधळण ही पाटेकर यांच्या माध्यमातून नाझीर उल्ला सारख्या आरोपी शिक्षकांवर होत असून शिक्षण व्यवस्थेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा या माध्यमातून चव्हाट्यावर आल्याचे दिसत आहे नझिर उल्ला पटेल सारख्या कुख्यात आरोपीला त्याची जागा दाखवून देण्यासाठी तक्रारदार हे शिक्षण मंत्री व मुख्यमंत्र्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती आहे गरज पडल्यास आरोपी नाझीर उल्ला पटेल सह शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांच्या विरोधात आमरण उपोषणाला बसण्याची तयारी तक्रारदाराने दर्शवली आहे