INDIA NEWS

Press

सरस्वती विद्यालय व गर्ल्स उर्दू हायस्कूल वर कार्यवाहीची टांगती तलवार

salim khan 17 june 2025

शासनाची दिशाभूल करून करोडो रुपयांचा वेतन स्वरूपात भ्रष्टाचार करणारे शिक्षक नाझिर उल्ला पटेल व वर्षा गावंडे

बोगस शिक्षक प्रकरणात खाजगी संस्थांवर कारवाईचा बडगा..सरस्वती विद्यालय व गर्ल्स उर्दू हायस्कूल वर कार्यवाहीची शक्यता..शिक्षक वर्षा गावंडे तथा नाजीर उल्ला पटेल मुळे कार्यवाहीची टांगती तलवार..

अकोट मधील नामांकित असलेले सरस्वती विद्यालय येथील शिक्षिका वर्षा गावंडे (चर्पे) यांनी शासनाची दिशाभूल करून बोगस बीएड पदवी प्राप्त केली असून बीएड कॉलेज तथा शासनाची सुद्धा फसवणूक केली आहे यादरम्यान करोडो रुपये वेतनाद्वारे शासनाकडून गावंडे यांनी लाटले आहेत हा सर्व प्रकार सरस्वती विद्यालयाच्या व्यवस्थापनाला माहिती असून सुद्धा वर्षा गावंडे यांचे निलंबन करून कोणतीही कठोर कारवाई व्यवस्थापनाने केली नाही तसेच गर्ल्स उर्दू हायस्कूल अकोट येथील शिक्षक नाझीर उल्ला पटेल यांनी सुद्धा 420 च्या गुन्ह्यांमध्ये वीस दिवस सतत सेंट्रल जेलमध्ये काढले होते त्यामुळे व्यवस्थापनाने तात्काळ नाझीर उल्ला पटेल यांचे निलंबन करणे गरजेचे होते परंतु असे न करता उलट पटेल याला प्रोत्साहन देत कायमस्वरूपी गैरहजर राहून सुद्धा वेतन दिल्या जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे

हे सर्व प्रकार अकोट मधील सामाजिक कार्यकर्ते रविराज मोरे यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर ऐतिहासिक उपोषण करून राज्य सरकारच्या लक्षात आणून दिले आणि त्याचा योग्य पाठपुरावा मोरे यांनी केला असता या दोन्हीही शिक्षकांवर नियमानुसार संस्थांनी जाणीवपूर्वक कठोर कारवाई न केल्यामुळे गर्ल्स उर्दू हायस्कूल व सरस्वती विद्यालय यांच्यावर कार्यवाही होण्याची शक्यता बळवली आहे येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये अशा अनेक संस्थांवर कार्यवाहीची टांगती तलवार उभी ठाकली आहे अशी गंभीर बाब शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात आली असून लवकरच या शिक्षकांकडून फसवणूक करून घेतलेल्या वेतन स्वरूपातील करोडो रुपयांची वसुली करण्यासाठी हायकोर्टात याचिका सुद्धा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते रविराज मोरे यांनी दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish