INDIA NEWS

Press

जळगाव:संत तुकाराम नागरी सहकारी पतसंस्था कडून पूरग्रस्त परिवारातील मुलांना शाळेचे साहित्य मोफत वाटप..राज्यातील नामांकित संस्थांसमोर हा एक नवा आदर्श..

Parmeshwar hatole 29 July 2023

वडशिंगी – २२ जुलै रोजी आलेल्या महापुराची झळ संपूर्ण जळगाव जिल्ह्यात जवळपास सर्वच गावांना बसली त्यामध्ये वडशिंगी या गावात घरे व घरातील सर्व अन्नधान्य शालेय साहित्य पुरामध्ये वाहून गेले त्यामुळे मूलभूत गरजा म्हणून व मुलांच्या शालेय शिक्षणावर कोणताही परिणाम होऊ नये याकरिता सामाजिक दायित्व म्हणून वडशिंगी गजानन नगर, नरहरी नगर तसेच बस स्टँड परिसरामधील महापुराचा फटका बसलेल्या परिवारातील जवळपास 90 विद्यार्थ्यांना जळगाव येथील संत तुकाराम नागरी सहकारी पतसंस्था च्या वतीने सर्व शालेय साहित्य मोफत वाटप करण्यात आले..

शालेय साहित्य वाटप करताना संत तुकाराम पतसंस्थेचे पदाधिकारी..

त्यावेळी वडशिंगी येथील पोलीस पाटील अनंत ठाकरे, सरपंच सुनील वानखडे, गजानन गावंडे, चंदू वाघ, दाते सर,प्राथमिक शाळेचे शिक्षक वृंद व सर्व सन्माननीय नागरिक उपस्थित होते शालेय साहित्य गरजेच्या वेळी मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळाले. संत तुकाराम नागरी सहकारी पतसंस्था यांनी मदत केल्यामुळे शिक्षक वर्ग व स्थानिक ग्रामस्थांनी पतसंस्थेचे उल्लेखनीय कार्याचे आभार मानले तसेच संपूर्ण राज्यभरात ही बाब अधोरेखित केली जाईल अशी जनभावना व्यक्त केली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish