INDIA NEWS

Press

आ.भारसाकळेंना भेटा, नाहीतर पी ए महाले ला भेटा,खा.अनुप धोत्रेच्या पी ए चा तक्रारदाराला अजब सल्ला..

Abhijit solanke 18 April 2026

बोर्डी गौण खनिज घोटाळा : दंडानंतरही ‘सेटिंग’चा खेळ सुरूच ! मंत्री-खासदारांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सगळेच माफियांना कवच?”

अकोट: तालुक्यातील बोर्डी ग्रामपंचायत हद्दीतील गौण खनिज प्रकरणाने आता संतापाचा कळस गाठला असून, दंडात्मक कारवाई झाल्यानंतरही ‘सेटिंग’ करून आदेश बदलवण्याचा आणि त्या आदेशांचीही अंमलबजावणी टाळण्याचा धक्कादायक खेळ उघडकीस येत आहे.

प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणा यांच्यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.माहितीनुसार, गौण खनिज प्रकरणात दंड,आकारल्यानंतर काही जण थेट महसूल मंत्र्यांकडे धाव घेतात आणि ‘सेटिंग’ करून आदेश पारित करून घेतात. मात्र आश्चर्य म्हणजे, असे आदेश निघाल्यानंतरही स्थानिक अधिकाऱ्यांकडून त्याची अंमलबजावणी केली जात नाही.

यामुळे संपूर्ण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.या प्रकरणातील तक्रारदार स्वतः पत्रकार असून, त्यांनी संबंधित सर्व स्तरांवर पाठपुरावा केला आहे. त्यांनी पालकमंत्री आकाश फुंडकर, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे, तसेच अकोटचे उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर आणि तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण यांच्याशी संपर्क साधून प्रतिक्रिया घेतल्या.

मात्र धक्कादायक बाब म्हणजे, या सर्वांच्या प्रतिक्रियांमधून दंड वसूल करण्यापेक्षा संबंधित माफियांना वाचवण्याचाच प्रयत्न अधिक दिसून येत असल्याचा आरोप होत आहे.स्थिती इतकी गंभीर आहे की, गौण खनिज माफिया हे जणू मंत्री, खासदार, पालकमंत्री आणि अधिकारी यांना ‘खिशात’ घालूनच वावरत असल्याचा संतापजनक सूर आता उमटू लागला आहे.

देशाची संपत्ती असलेले गौण खनिज जणू खाजगी मालमत्ता असल्यासारखे उघडपणे लुटले जात आहे. निसर्गाची प्रचंड हानी होत असतानाही जबाबदार यंत्रणा मात्र निष्क्रिय किंवा संशयास्पद भूमिकेत असल्याचे चित्र आहे.“जनता मतदान करते, आणि निवडून आलेलेच जनतेच्या पैशावर मौज करतात” अशी तीव्र प्रतिक्रिया आता नागरिकांमधून उमटत आहे.

या सर्व घडामोडींमुळे तक्रारदार पूर्णपणे हतबल झाल्याचे दिसून येते. न्याय मिळवण्यासाठी दरवाजे ठोठावूनही फक्त “तारीख पे तारीख” मिळत असल्याने, ही संपूर्ण यंत्रणा तक्रारदाराच्या थकव्याची आणि शेवटाची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.एकूणच, अकोटमधील ही परिस्थिती लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक असल्याचे स्पष्ट होत आहे.

“सर्व यंत्रणा भ्रष्ट असून सामान्य नागरिकाला न्याय मिळणारच नाही” अशी भीषण भावना आता पसरत आहे.या प्रकरणात तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा हा संताप उफाळून येण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा नागरिक आणि तक्रारदार बांधवांकडून देण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish