अकोला: होली क्रॉस प्री प्रायमरी कडून विद्यार्थ्यांना विषबाधा होणारे बिस्किटांचे वाटप..महालक्ष्मी सेल्स व होली क्रॉस यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप..
अकोला: येथील जीएमडी मार्केट मधील महालक्ष्मी सेल्स यांनी बिस्किटांमध्ये अफरातफर करून आमची फसवणूक केली-प्राचार्य होली क्रॉस प्री प्रायमरी स्कूल अकोला
आम्ही सर्व बिस्किटे व पॅकेट्स स्वतः होली क्रॉस प्राचार्यासमोर चेक करून दिली त्यामुळे होली क्रॉस व्यवस्थापन यांनीच बिस्किटांमध्ये अफरातपर केली असेल किंवा स्वतःची चूक झाकण्यासाठी आमच्यावर आरोप करणे हे चुकीचे-चेतन ठाकरे संचालक महालक्ष्मी सेल्स जी एम डी मार्केट अकोला
RaviRaj 13 sept 2023
Akola: आज 13 सप्टेंबर रोजी होली क्रॉस प्री प्रायमरी व हायस्कूल याचा वाढदिवस साजरा करण्यासाठीचा एक अनोखा उपक्रम दरवर्षीप्रमाणे नियमित राबवित असतात त्यानिमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बिस्किट्स वाटप करण्यात आले परंतु वाटप करण्यात आलेले बिस्किट हे एप्रिल 2023 या महिन्यातच मुदत संपलेली आहेत तरीही होली क्रॉस व्यवस्थापनाकडून सर्व मुलांना एक्सपायर झालेली बिस्किटे वाटप करून मोकळे झाले..

होली क्रॉस शाळेतील सर्व विद्यार्थी घरी जात असताना जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी ती बिस्किटे खाल्ली तर काही विद्यार्थ्यांच्या पालकांना लक्षात आले की की हे बिस्किट एक्सपायर झालेले आहेत याची विचारणा प्री प्रायमरी चे हेड एडवर्ड यांना अनेक पालकांनी संपर्क साधून केली असता एडवर्ड यांनी उडवा उडवी चे उत्तरे दिली एडवर्ड यांच्या उत्तरातून अनेक पालकांच्या हे लक्षात आले की मुलांची जीवित हानी झाली तरीसुद्धा होली क्रॉस व्यवस्थापनाला काहीच फरक पडणार नाही म्हणून काही पालकांनी प्रत्यक्ष होली क्रॉस शाळेत जाऊन प्रिन्सिपल यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता शाळेमध्ये सर्व होली क्रॉस शिक्षकांची जंगी पार्टी सुरू होती तरीसुद्धा अनेक पालकांनी प्रिन्सिपल यांना भेटण्याची विनंती केली असता प्रिन्सिपल यांनी जेवण चालू असल्याचे कारण सांगून अनेक पालकांना जवळपास दोन तास तात्काळत उभे ठेवले एवढेच नाही तर पालकांनी होली क्रॉस च्या अशा या वागण्याला कंटाळून पत्रकारांना पाचारण केले असता पत्रकारांना सुद्धा होली क्रॉस च्या प्राचार्य यांनी महत्त्वाची पार्टी व कार्यक्रम सुरू असल्याचे कारण सांगून एक तास ताटकळत उभे ठेवले त्यामुळे होली क्रॉस व्यवस्थापन किती बेजबाबदार आहे हे यावरून लक्षात येते..
होली क्रॉस प्राचार्य यांना या विषबाधा होणारे बिस्किटांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो याच्याशी काहीही देणे घेणे असल्याचे दिसत नाही उलट बिस्किट एक्सपायर झालेले असल्याचे मेसेज सर्व पालकांना मोबाईल वरून पाठवले गेले आहेत अशी बतावणी करीत जबाबदारी झटकण्याचे काम होली क्रॉस व्यवस्थापनाकडून झाले आहे. तसेच होली क्रॉस प्राचार्य यांनी स्वतः बिस्किटांची खरेदी ही महालक्ष्मी सेल्स जीएमडी मार्केट येथून केली आहे व जीएमडी मार्केट मधील महालक्ष्मी सेल्स चे सर्वेसर्वा चेतन ठाकरे यांनी एस्पायर झालेले बिस्किट आम्हाला दिले आहेत व आमची फसवणूक केलेली आहे असे आरोप होली क्रॉस च्या प्राचार्यांनी केले आहेत तर महालक्ष्मी सेल्स चे संचालक ठाकरे यांनी हे सर्व आरोप फेटाळत आमच्याकडून कुठलीही बिस्किटांमध्ये फेरफार झाली नाही आमच्याकडून होली क्रॉस ला फ्रेश बिस्किटे दिले आहेत होली क्रॉस ने जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ खेळण्याचे काम केले आहे तसेच बिस्किट वाटप करताना प्रत्येक पॅकेटवर तारीख बघूनच वाटप करण्यात येऊ शकले असते परंतु होली क्रॉस व्यवस्थापनाला पॅकेट वरील तारीख चेक करून देणे हे गरजेचे वाटले नाही का? असे अनेक प्रति प्रश्न महालक्ष्मी सेल्स यांच्याकडून करण्यात आली यावरून स्पष्ट होते की महालक्ष्मी सेल्स व होली क्रॉस यांच्यामध्ये संगणमत करूनच हा वरील सर्व जीवघेणाप्रकार घडलेला आहे त्यामुळे वरील सर्व प्रकाराला जबाबदार कोण असा प्रश्न पत्रकारांनी विचारले असता होली क्रॉस व महालक्ष्मी सेल्स यांनी जबाबदारी स्विकारण्यास नकार दिला उलट होली क्रॉस प्राचार्याने महालक्ष्मी सेल्स विरुद्ध कोणतेही तक्रार दिलेली नाही तसेच शिक्षणाधिकारी व मी बघून घेईल असे बेजबाबदार उत्तर होली क्रॉस प्राचार्य यांच्याकडून पत्रकारांना मिळाले.
