hacklink al hack forum organik hit kayseri escort jojobet 1019padişahbetdeneme bonusu veren sitelermarsbahis 463deneme bonusu veren sitelerbetwoondeneme bonusu veren sitelerviagra onlinepadişahbetsapanca escortbahis1000Mostbetbahis ve casino oyunlarıMadridbetdeneme bonusu veren sitelercasbomromabet güncel girişonwintambetpadişahbet girişmatbetBahiscommatbet

INDIA NEWS

Press

अकोट ग्रामीण पोलिसांच्या वाहनाचा अपघात तर शहर पीएसआयच्या घरासमोरील उभ्या गाडीचे टायर चोरी..

अकोट: शहर पोलीस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष पीएसआय च्या घरासमोरील उभी असलेल्या त्यांचेच मावशे गजानन भिसे यांच्या गाडीचे टायर चोरी गेल्यामुळे चोरांनी एक प्रकारचे चॅलेंजच शहर पोलिसांना केले आहे..

RaviRaj 9 March 2014

Akot: काल जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन होते त्यामध्ये नेते मंडळी, अधिकारी, व पोलीस अधिकारी सुद्धा सामील होऊन महिला सशक्तिकरण, महिलांची सुरक्षा अशा अनेक विषयावर मार्गदर्शन करून महिला दिनाच्या कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत असतात..

परंतु अकोट शहर पोलीस स्टेशन मधीलच एका कर्तव्यदक्ष पीएसआय च्या घरासमोर उभी असलेल्या गाडीचे टायर चोरी गेल्याची घटना काल समोर आली आहे.. विशेष म्हणजे ही गाडी पीएसआय यांचे मावशे गजानन भिसे यांची आहे आपल्या कर्तव्यातून दरारा निर्माण करणारे कर्तव्यदक्ष समजल्या जाणारे पीएसआय च्या घरासमोरील त्यांच्याच नातेवाईकांची गाडी सुरक्षित नाही म्हणजेच टायर चोरांनी अकोट पोलिसांना एक प्रकारचे चॅलेंजच केले आहे का? पीएसआय च्या घरासमोरून चोरी होते तर बाकीच्यांचे काय! “कुठे नेऊन ठेवले माझे आकोट” अशी म्हणण्याची वेळ भोळ्याभाबड्या नागरिकांवर येऊ नये.. यानिमित्ताने अकोट शहराच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे..

तसेच काल एका दुसऱ्या घटनेने याला दुजोरा देत ग्रामीण पोलिसांचे एक पथक गुटख्यामधील आरोपीला अकोला मध्यवर्ती कारागृह येथे रवानगी करण्यासाठी जात असताना अकोट-अकोला रोडवर ऑटो व पोलीस गाडी यांच्यामध्ये भीषण अपघात झाला त्यामध्ये ऑटो मधील प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यामध्ये एक महिला सुद्धा गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे..

अकोट अकोला या मार्गावरील असलेले जागोजागी खड्डे चुकवत असताना ऑटो चा व पोलीस गाडीचा अपघात झाल्याचे वृत्त आहे त्यामुळे विद्यमान आमदार तालुक्यातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आकोट -अकोला रस्त्याचा दुर्लक्षित करून शासकीय इमारतीच्या बांधकामाचे उद्घाटन करण्यात व्यस्त आहेत अकोट-अकोला रस्त्यामुळे आजपर्यंत अनेकांचे बळी गेलेले आहेत..या रस्त्यामुळे अनेक महिलांच्या डोक्यावरचे छत हरवले आहे..

त्यामुळे शासकीय इमारतीच्या बांधकामाच्या फिती कापण्यापेक्षा आकोट अकोला रस्त्याचा प्रश्न जरी कायमस्वरूपी मार्गी लावला तरी इतर कामाचा वाजा-गाजा करण्याची गरजच विद्यमान आमदारांना पडली नसती या प्रसंगावरून आपले अकोट किती सुरक्षित आहे किंवाकुठे नेऊन ठेवले माझे आकोट” अशी म्हणण्याची वेळ जागतिक महिला दिनाच्या दिवशी सामान्य नागरिकांवर आलेली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish