शशिकांत उर्फ मुन्ना अग्रवाल हा भयंकर भ्रष्टाचारी ! याच्या निकृष्ट कामात कुणाकुणाची टक्केवारी..
salim Khan 27 May 2024

गेल्या आठवड्याभरात पुण्यातील हिट अँड रन प्रकरण चांगलेच तापले आहे. पैशाचा माज असलेल्या अग्रवाल नावाच्या बिल्डरच्या मुलाने दोन निर्दोष मुलांना अतिशय निर्दयीपणे चिरडले आहे परंतु अग्रवाल कुटुंबांना या दोन मृत्यू झाल्याचा पश्चाताप झालेला दिसत नाही. त्यासोबतच कायद्याची अंमलबजावणी अधिकाधिक कठोर करण्याची गरज आहे हे या ठिकाणी अधोरेखित करण्यासारखे आहे..असे अनेक अग्रवाल बिल्डर भ्रष्टाचार करून कमावलेल्या काळया पैशाचा माज खुलेआम सर्वत्र दाखवत आहेत..
याचेच एक उदाहरण म्हणजेच अकोट तालुक्यातील गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर शशिकांत उर्फ मुन्ना अग्रवाल यांने तालुक्यातील अनेक खेडेपाडे जोडणारे रस्त्याचे बांधकाम केले आहे परंतु सहा महिन्यातच कामाचा दर्जा हा अतिशय निकृष्ट असून बांधकाम केलेले रस्ते उखडण्यास सुरू झालेले आहेत.. मुन्ना अग्रवाल च्या रस्ते बांधकामाबाबत आजपर्यंत कोणत्याही इंजिनिअरने दोष काढलेला नाही उलट कामाचा दर्जा न तपासता एसी कार्यालयामध्ये बसून उत्कृष्ट दर्जाचे काम केले असल्याचे सर्टिफिकेट देण्याची परंपरा ही कायम सुरू आहे.. यामध्ये इंजिनियर व विद्यमान आमदार यांचा टक्केवारीचा हिशोब असल्यामुळे शशिकांत अग्रवाल उर्फ मुन्ना अग्रवाल याला देयके मिळण्यासाठी कोणतीही रोखठोक कधीच होत नसल्याचे आरोप शिरसोली ग्रामस्थांनी केले आहे..

रस्ता बांधकाम करीत असताना रस्त्याचे डायमीटर हे खूपच लहान असल्याने एकाच वेळी दोन वाहने सुद्धा जाऊ शकत नाहीत किंवा त्याहीपेक्षा मोटरसायकल सुद्धा एका वेळी वाहनाला क्रॉस करून जाऊ शकत नाही त्यामुळे ट्रॅक्टर चालक यांचे भरपूर अपघात या मुन्ना अग्रवाल च्या भ्रष्टाचारी रस्त्याच्या बांधकामा मुळे झाले आहेत अनेकांचे संसार उद्धवस्त झालेले आहेत कुणाचा मुलगा तर कुणाचा भाऊ तर परिवारातील कर्ता पुरुष या अग्रवालच्या मुजोरी मुळे गमवावा लागला अनेक परिवार रस्त्यावर या अग्रवालच्या भ्रष्टाचाराने आणून ठेवले आहेत.. या सर्व गैरप्रकाराला विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांचे प्रोत्साहन असून मुकसंमती असल्याचे आरोप ग्रामस्थांकडून केले जात आहेत.. आमदाराला फक्त टक्केवारी मध्ये स्वारस्थ असल्याचे बोलले जाते अशा आमदाराला मतदारांच्या मताची गरज आहे की नाही असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत..

तालुक्यामध्ये एवढे सर्व गैरप्रकार होत असताना आमदाराचे अस्तित्व हे शून्य असल्याचे सतत जाणवते त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये विद्यमान आमदार यांना घरी बसवण्याची वेळ निश्चितच आली आहे अशा जनभावना संपूर्ण मतदारसंघातून ऐकल्या जात आहेत..