आणखी एका पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाईचा बडगा ! अकोट पोलिसांवर कारवाई थांबता थांबेना..
Salim khan 8 june 2024
भारताच्या इतिहासात अकोट शहर पोलिसांची अनोखी कामगिरी मागील काळात बघायला मिळाली.. एका मृत्यू प्रकरणात जवळपास अर्धे पोलीस स्टेशन खाली झाले त्यामध्ये पीएसआय, ठाणेदार, कॉन्स्टेबल व शिपाई अशा दिग्गज कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.. व हे मृत्यू प्रकरण जवळपास तीन महिने लपवून,दाबून ठेवण्याचा पराक्रम अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला त्यांच्यावर सुद्धा कारवाईचा बडगा हा वेगवेगळ्या प्रकरणात अजूनही सुरूच आहे..
एवढ्यावरच आकोट पोलीस हे थांबले नसून “नाकात मोती जड ठरलेल्या वरिष्ठ पत्रकारावर वचपा व त्यासोबतच आवाज दाबण्याकरिता छोट्या मोठ्या आर्थिक फायद्याकरिता “अकोट पोलिसांनी मर्यादा ओलांडली आहे.. ते म्हणजे 27 फेब्रुवारी 2023 रोजी मनीष राव यांनी अकोट आयसीडीएस कार्यालयातील पर्यवेक्षिका प्रतीक्षा शेगोंकार व कनिष्ठ लिपिक गजानन चंदन यांच्या विरोधात तक्रार दिली होती की इंडिया न्यूज चे पत्रकार रविराज मोरे यांनी अकोट आयसीडीएस कार्यालयातील अनेक वेगवेगळ्या प्रकारचा भ्रष्टाचार उघडकीस आणून कार्यालयाविरुद्ध बातम्या प्रकाशित केल्यामुळे बातम्यांच्या वचपा काढण्याकरिता रविराज मोरे सह मनीष राव यांच्यावर सुद्धा गजानन चंदन व सुपरवायझर प्रतीक्षा शेगोकार यांच्याकडून खोटे गुन्हे दाखल करण्याची शक्यता आहे तशा प्रकारच्या धमक्या सुद्धा मनीष राव यांना देण्यात आल्या होत्या..
त्या अनुषंगाने वरील मजकुराची तक्रार मनीष राव यांनी अकोट पोलीस स्टेशनला दिली होती..परंतु रविराज मोरे यांचा आवाज दाबण्याकरिता व आयसीडीएस कार्यालयातील भ्रष्टाचार हा बाहेर आल्यास भ्रष्टाचारात हात भिजलेल्या कर्मचारी व सहभाग असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नोकरीवर गदा येऊ नये याकरिता पोलीस प्रशासनातील वरिष्ठांनी आर्थिक देवाण-घेवाण करीत मनीष राव यांनी दिलेली तक्रारच गायब करून टाकली.. व आठ महिन्यानंतर पर्यवेक्षिका प्रतीक्षा शेगोंकार यांची खोटी तक्रार घेऊन रविराज मोरे यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याचे कटकारस्थान आयसीडीएस कर्मचारी यांच्या सोबत मिळून अकोट पोलिसांनी रचले.. परंतु या सर्व कटकारस्थाना मध्ये आदेशाचे पालन करणारे पोलीस कर्मचारी विजय खेकडे यांचा बळी मात्र वरिष्ठांनी गमावला..
आयसीडीएस कर्मचारी व पोलीस यांच्या मधील आर्थिक खेळात एक गरीब कर्मचारी ज्याने आयुष्यभर इमानदारीने नोकरी व आपले कर्तव्य बजावलेले असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कारस्थानाचा बळी ठरला..
मनीष राव यांची तक्रार गायब केल्याचा कसुरी अहवाल उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांनी पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्याकडे कार्यवाही करण्यासाठी गेली सहा महिन्यापासून पाठवलेला आहे.. परंतु विजय खेकडे यांच्यावर कार्यवाही मात्र अजूनही झालेली नाही.. पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांची तत्पर कार्यपद्धती असूनही विजय खेकडे यांचे रिटायर्ड होण्याची वाट बच्चन सिंग पाहत आहेत का? येणाऱ्या सहा-सात महिन्यात विजय खेकडे हे रिटायर्ड होणार आहेत तोपर्यंत कार्यवाही होणार की नाही हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे..विजय खेकडे यांना तक्रार गहाळ करण्यासाठी कोणाचे प्रोत्साहन मिळाले..विजय खेकडे यांनी वरिष्ठांच्या आदेशाशिवाय हे कृत्य केले आहे का? खेकडे यांचा तक्रार गहाळ करण्याचा हेतू काय होता.. रविराज मोरे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून कायमस्वरूपी आवाज दाबणे की भ्रष्टाचारात हात ओले करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोकरी वाचवण्याकरिता.. रविराज मोरे यांच्या बेधडक लेखणीमुळे शहर सोडून जाण्याकरिता कट रचल्या जात आहे का ? एवढे मोठे षडयंत्र कशासाठी ? कोणकोणत्या दिग्गजांचे हात या प्रकरणांमध्ये गुंतलेले आहेत..असे अनेक प्रश्न या कारवाईच्या माध्यमातून उपस्थित होत आहेत..
बस स्टँड मधील पोलीस चौकीसमोरच प्रतीक्षा शेगोंकार यांनी घटनाक्रम तक्रारी मध्ये नमूद केला.. त्याप्रमाणे एवढी मोठी घटना घडत असताना बस स्टँड मधील पोलीस चौकीमध्ये पोलीस कर्मचारी काय करत होते.. प्रतीक्षा शेगोकार यांनी हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिसांची मदत का घेतली नाही असे अनेक संशय पोलिसांच्या कार्यपद्धतीवर निर्माण झालेले आहेत.. त्यामुळे भविष्यात विजय खेकडे सह या प्रकरणात अजून किती पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होईल हे वेळच ठरवेल..त्यामुळे अकोट पोलिसांना झाले तरी काय ? अशी वारंवार नामुष्कीची वेळ अकोट पोलिसांवर येत असल्याने जनता सुद्धा त्रस्त झाली आहे..