पुन्हा एकदा महेश गणगणे यांचा कौतुकास्पद उपक्रम..गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार सोहळ्याचे आयोजन..
parmeshwar hatole 12 July 2024
Akot : विद्यार्थ्यांचे वेळोवेळी कौतुक व त्यांचा योग्य सन्मान हा व्हायलाच पाहिजे सोबतच त्यांच्या पालकांच्या परिश्रमांचा सुद्धा आदर होणे हा गरजेचा असतो.. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन ऊर्जा व जिद्द निर्माण करण्याचे काम योग्य मार्गदर्शक यांच्याकडून नियमित होत असते.. त्या अनुषंगाने वेळोवेळी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व जाणणारे सुधाकरराव गणगणे यांचा वारसा जपणारे महेश गणगणे यांचा कौतुकास्पद उपक्रम हा सदैव अविरत सुरू असतो..
म्हणूनच येणाऱ्या 14 जुलै 2024 रोजी पुन्हा एकदा महेश गणगणे व त्यांच्या मित्र परिवाराने NEET/JEE/MHT CET परीक्षेतील 80% गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचे पुढील भविष्याकरिता प्रोत्साहन व त्यांना योग्य करियर मार्गदर्शन देऊन विद्यार्थ्यांसह पालकांचा सुद्धा सत्कार सोहळा आयोजित केला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व त्यांच्या पालकांमध्ये एक नवचैतन्य निर्माण करण्याचे काम महेश गणगणे यांनी केले आहे..हा सत्कार सोहळा श्रीकृष्ण मंदिर दर्यापूर रोड येथे 11 वाजता महेश गणगणे यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंद नितोने व रमण उपासे सह संपूर्ण मित्र मंडळ यांनी आयोजित केला असून सर्व विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संख्येने नोंदणी करण्याचे आवाहन केलेले आहे..