INDIA NEWS

Press

इंडिया न्यूज च्या बातमीचा इम्पॅक्ट..अकोट नगरपालिकेच्या अग्निशमन वाहनाची तात्काळ दुरुस्ती..वाहन अकोटकरांच्या सेवेत रुजू..

parmeshwar hatole 14 July 2024

इंडिया न्यूज चे सर्वेसर्वा रविराज मोरे .. प्रशासन व पदाधिकारी यांच्यावर वचक निर्माण करणारे व्यक्तिमत्व..

इंडिया न्यूज च्या बातमीची दखल ही तात्काळ ही घ्यावीच लागते कारण इंडिया न्यूज हे सत्यता तपासून व प्रत्यक्ष खऱ्या असलेल्या बातम्या प्रकाशित करणारे व अन्यायाच्या विरुद्ध लढणारे एकमेव जनसामान्यांच्या हक्काचे न्यूज चैनल आहे..त्यामुळे एकाच वर्षात खूप मोठी झेप या न्यूज चैनल ने घेतलेली आहे..


14 जून रोजी इंडिया न्यूज ने अकोट नगर परिषद च्या भोंगळ कारभाराबाबत “अकोट मतदार संघाचा विकास की भकास, आमदार व नगरपरिषदेच्या राजकीय खेळात जनतेचा मात्र बळी”.. अशा मथळ्याची बातमी प्रकाशित केली होती.. 👇👇👇👇👇👇👇👇

https://bit.ly/3KIsVFK

👆👆14 जून ची बातमी पाहण्यासाठी वरील लिंक क्लिक करा 👆👆👆👆👆👆

त्यामध्ये अकोट नगरपरिषदेचे अग्निशमन वाहन गेली कित्येक महिन्यापासून नादुरुस्त आहे त्यामुळे अकोट नगरपरिषदेकडे आग विझवण्याकरिता कोणतेही पर्यायी वाहन उपलब्ध नसल्यामुळे तालुक्यामध्ये कोणतीही दुर्घटना घडल्यास तेल्हारा किंवा शेजारील अमरावती जिल्ह्यातून अग्निशमन वाहनांची व्यवस्था करण्याची वेळ आकोट नगर प्रशासनावर आली होती

इंडिया न्यूज च्या बातमी नंतर तात्काळ प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉ. नरेंद्र बेंबरे यांना खडबडून जाग आली.. व स्वतःला नेहमी हवेत ठेवणारे बेंबरे यांनी अग्निशमन वाहन दुरुस्ती करून जनतेच्या सेवेत उभे केले..

त्यामुळे संपूर्ण अकोट तालुका हा अग्निशमन वाहन उपलब्ध नसल्यामुळे दहशती खाली जगत होता परंतु नगरपरिषद चे प्रशासक व मुख्याधिकारी डॉ नरेंद्र बेंबरे यांना मात्र अकोटच्या जनतेशी काहीही देणे घेणे नसल्याचे अग्निशमन वाहनाला दुरुस्तीसाठी लागणारा अमर्यादित वेळेमुळे सिद्ध झाले..

परंतु इंडिया न्यूज ने बातमी प्रकाशित केल्या मुळे डॉ नरेंद्र बेंबरे यांची झोप उडाली व अग्निशमन वाहनाला तात्काळ प्राधान्य देऊन अग्निशमन वाहन दुरुस्ती करून आकोटकरांच्या सेवेत रुजू केले त्यामुळे सदैव हवेत असणाऱ्या नरेंद्र बेंबरे यांना अग्निशमन वाहन हे अत्यंत अत्यावश्यक असून कोणत्याही क्षणी दुर्घटना होऊ शकते हे पटवून देण्यास इंडिया न्यूज यशस्वी ठरले..

विद्यमान आमदारांनी उद्घाटन केलेली प्रशस्त इमारत परंतु सतत गैरहजर असलेले मुख्याधिकारी डॉ नरेंद्र बेंबरे विना उभी..

म्हणून अकोट नगर परिषदेचे अग्निशमन वाहन हे आज रोजी अकोटकरांच्या सेवेत उभे असण्याचे कारण म्हणजे इंडिया न्यूज च्या बातमीची दखल ..सोबतच या निर्दयी,अहंकारी , मगरूर अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर नियंत्रण व वचक ठेवण्याचे काम इंडिया न्यूज ने केले आहे त्यामुळे सर्वत्र इंडिया न्यूज व संपादक रविराज मोरे यांचे कौतुक होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish