INDIA NEWS

Press

रस्त्यामध्ये भ्रष्टाचार, चिपी गायरान,धोंडाआखर आदिवासीं आक्रमक..

chanchal pitambarwale 8 Dec 2024

रस्त्यामध्ये भ्रष्टाचार,चिपी गायरान धोंडाआखर आदिवासीं आक्रमक..

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुका हा मध्य प्रदेश व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या सीमेवर सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेला आहे सातपुडाच्या पर्वतरांगा यांच्या भोवताली लहान मोठ्या तांड्यामध्ये आदिवासी राहतात यांचा सर्वांगीण विकास साधण्याकरिता शासनाकडून वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत परंतु स्थानिक राजकारण व नेत्यांची निष्क्रियता यांच्यामुळे हा भाग अत्यंत मागासलेला असून स्वातंत्र्य पूर्व काळापासून हा भाग सतत दुर्लक्षित आहे

या आदिवासी भागात मूलभूत सुविधा रस्ते वीज पाणी याचा सुद्धा कायम अभाव राहिला आहे कधी नव्हे ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजना च्या माध्यमातून आडगाव ते धोंडा आखर रस्त्याची दर्जोन्नती करण्याचे काम सुरू झाले त्यामुळे या आदिवासी बांधवांच्या आयुष्यात पहिल्यांदा रस्ता बघायला मिळणार अशा आशा पल्लवीत झाल्या परंतु हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा कंत्राट दाराकडून सुरू असून दहा ते पंधरा फूट खोल खोदून माती रस्त्यावर टाकल्या जात आहे मातीवर कोणतीही योग्य प्रक्रिया व रोड रोलर न फिरवता पाण्याचा वापर कुठेच नाही जिवंत गिट्टी चा थर या रस्ता बांधकामावर दिसत आहे गायरान, चिपी, धोंडा आखर आजूबाजूच्या सर्व रहिवासी असलेले आदिवासी बांधवांना या रस्त्यावरून वाहतूक करण्यास मोठा जीव घेणा प्रवास करावा लागत असून महिला व शाळकरी मुलांना खूप मोठी कसरत करावी लागत आहे त्यामुळे मागील ७५ वर्षापासून हाल भोगत सहन करीत असलेले आदिवासी बांधव आता मात्र आक्रमक झालेले आहेत “आमच्या भाग्यात दर्जेदार रस्ता नाही पाण्याकरिता भटकंती व हक्काचा निवार्या पासून सुद्धा आम्ही वंचित आहोत” चिपी चे धरण सुद्धा हे सरकार पूर्ण करू शकले नाही त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे अशा भावना आदिवासी बांधवांनी व्यक्त केल्या आहेत

आदिवासी भागात एकमेव असे वार्तांकन करीत असलेले इंडिया न्यूज चे प्रतिनिधी

“या देशात आम्हाला मूलभूत सुविधा सुद्धा मिळू शकत नाही तर आम्ही मानवाचा जन्म घेऊन चूक केली का? असा प्रश्न या गावकऱ्यांनी उपस्थित केला त्यामुळे आमच्या आयुष्यात पहिल्यांदा एकमेव होत असलेला रस्ता तरी दर्जेदार करावा अशी मागणी सर्व गावकऱ्यांनी एकत्रित केली आहे अन्यथा कंत्राटदार ज्योती कन्स्ट्रक्शन कंपनीच्या विरोधात हजारोच्या प्रतिनिधी वार्तांकन करताना प्रतिनिधी वार्तांकन करताना वर्तमान करितांना प्रतिनिधी संख्येने जिल्हाधिकारी कार्यालय अकोला समोर तीव्र आंदोलन करण्याचा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे

इंडिया न्यूज चा इम्पॅक्ट.! कंत्राटदाराचे धाबे दणाणले

ज्योती कन्स्ट्रक्शन कंत्राटदाराने इंडिया न्यूजचे प्रतिनिधी वार्तांकन करीत असल्याचे समजतात तात्काळ एका रात्रीत दहा ते पंधरा फूट रस्त्याच्या कडेला खोल असलेली दरी बुजवण्याचा प्रयत्न केला
ज्योती कन्स्ट्रक्शन कंपनीचे सब कॉन्ट्रॅक्टर अकोल्याचे अग्रवाल बंधू यांनी भ्रष्टाचार लपवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी इंडिया न्यूज हे थांबणार नाही येणाऱ्या पावसाळ्यात रस्ता हा शंभर टक्के खचणार आहे त्यामध्ये अनेकांची जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही याला जबाबदार कोण असा प्रश्न सुद्धा आदिवासी बांधवांनी उपस्थित केला आहे तात्पुरती सारवासारव करून अग्रवाल बंधूंची सुटका होणार नाही असे स्पष्ट मत इंडिया न्यूज चे सर्वेसर्वा रविराज मोरे यांनी व्यक्त केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish