सरस्वती शाळेचे मुख्याध्यापक भूषण ठाकूर यांच्यावर विनयभंगाचे आरोप..
Chanchal pitambarwale 14 Dec 2024
लाडक्या बहिणीची आर्त हाक, देवा भाऊंनी फिरवली पाठ
शिक्षिका रूपाली सोळंके यांनी केली मुख्यमंत्री यांच्याकडे कारवाईची मागणी ..अन्यथा आत्मदहनाचा इशारा..
Akot : यावर्षीच्या निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणींनी भरघोस मतांनी महायुती सरकारला निवडून दिले आहे लाडकी बहीण योजना सुरू करीत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना मतांकरिता चांगलेच डोक्यावर घेतले परंतु निवडणूक संपताच लाडक्या बहिणीकडे तीनही भावांनी पाठ फिरवली लाडक्या बहिणीचा मुख्यमंत्री असलेला देवा भाऊ आज गृहमंत्री पदाच्या वाटपामध्ये एवढा दंग झाला आहे की आपल्या एका निराधार बहिणीवर अत्याचार होत असूनही संरक्षण करण्यास असमर्थ ठरला आहे अकोट येथील नामांकित असलेले सरस्वती विद्यालय येथील शिक्षिका रूपाली सोळंके यांनी मुख्याध्यापक भूषण ठाकूर यांच्यावर विनयभंगाचे आरोप केले आहेत
सरस्वती शाळेचे मुख्याध्यापक भूषण ठाकूर
वारंवार मानसिक, आर्थिक व शारीरिक छळ करून मुख्याध्यापक भूषण ठाकूर हा रूपाली सोळंके यांना ब्लॅकमेल करून वारंवार शरीर सुखाची मागणी करीत असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यासह शिक्षणाधिकारी व पोलीस विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे परंतु एवढा मोठा गंभीर प्रकार असून सुद्धा पोलीस प्रशासनाने मात्र अजूनही या प्रकरणाची दखल घेतली नाही
म्हणून रूपाली सोळंके यांनी 16 डिसेंबर 2024 रोजी अकरा वाजता शिक्षणाधिकारी कार्यालय अकोला येथे आत्मदहनाचा इशारा दिला आहे तसेच याच शाळेमधील दुसरी एका शिक्षिकेची बीएड पदवी ही संशयास्पद असून भूषण ठाकूर या बीएड पदवीला जाणीवपूर्वक डोळे झाक करीत आहे एकाच वेळी बीएड व शासकीय नोकरी या शिक्षिकेने सांभाळली आहे याचे संशोधन करणे गरजेचे आहे असे अनेक शासनाची फसवणूक करून लाखो रुपयांचा गंडा घालणारे शिक्षक या शाळेत कार्यरत आहेत लवकरच त्यांचा सुद्धा पर्दा फाश होणार आहेच मुख्यमंत्री पदावर असलेला महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणीचा देवा भाऊ हा मात्र बहिणीचा विनयभंग होत असूनही चुप्पी साधून बसलेला आहे कोणत्याही बहिणीशी देवा भाऊला काहीच देणे घेणे राहिलेले नाही भूषण ठाकूर सारख्या नराधमाने यापूर्वी सुद्धा स्वतःच्याच ट्युशन क्लास मधील अल्पवयीन मुलींवर अत्याचार केले आहेत त्यामुळे मुख्यमंत्री देवा भाऊ ची गरज संपल्याने लाडक्या बहिणीकडे देवा भाऊ व इतर दोन्हीही उपमुख्यमंत्री भावांनी अक्षम्य दुर्लक्ष केले आहे लाडक्या बहिण योजनेचे पंधराशे रुपये करिता महाराष्ट्रातील कोणत्याही बहिणीची अब्रू पणाला लागत असेल तर अशी योजना नको बहिणींना सुरक्षा नसेल मुलांचे भविष्य घडवणाऱ्या शिक्षण संस्थांमधील भूषण ठाकूर सारखे नराधम महिलांचे शोषण करत असतील तर नको अशी योजना नको असा देवा भाऊ.. अशा भावना अनेक बहिणीकडून व्यक्त होत आहेत
मुख्यमंत्री व दोन्हीही उपमुख्यमंत्री यांच्या बाबतीत आपुलकीची भावना निर्माण झालेल्या सर्व बहिणींची आता मात्र झोप उडाली देवा भाऊ वर विश्वास ठेवल्यास किती मोठी किंमत चुकवावी लागते हे रूपाली सोळंके यांच्या प्रकरणावरून स्पष्ट होते गृहमंत्रालय स्वतःजवळ असून सुद्धा देवा भाऊ फक्त आणि फक्त राजकारणासाठीच ईडी सीबीआयचा वापर करीत आहेत मुख्यमंत्री देवाभाऊ कडून कोणत्याही बहिणींची सुरक्षा यापुढे होणार नाही हे समजायला बहिणींना खूप वेळ लागला आता हातातून वेळ निघून गेली असे बहिणींना आता पटू लागले आहे