INDIA NEWS

Press

नामांकित सायं दैनिकाच्या पत्रकाराची दयनीय अवस्था..व्हाईट कॉलर वरली माफियाला मिळेना जामीनदार

Salim Khan 4 june 2025

नायब तहसिलदार धमकी प्रकरण राजेश साळुंके ला भोवणार

अकोल्याचे नवनिर्वाचित पोलीस अधिक्षक अर्चित चांडक हे रुजू झाल्यापासून प्रहार मोहिमेअंतर्गत अवैध धंदे करणारे माफीयांच्या मुस्क्या आवळण्यात आल्या आहेत यादरम्यान अकोट सारख्या संवेदनशील विभागामध्ये चांगलाच वचक निर्माण झालेला आहे त्यामुळे दिवसेंदिवस जनसामान्यांमध्ये पोलिसांची मलीन झालेली प्रतिमा सुधारण्यास मदत होत आहे परंतु यापूर्वी 26 मे रोजी अवैध धंद्यांच्या विरोधात बातम्या प्रकाशित केल्यामुळे एका पत्रकारावर प्राणघातक हल्ला करून ॲट्रॉसिटी सारखे गंभीर गुन्हे दाखल केल्या गेले त्यामध्ये प्राणघातक हल्ला करणारे माफिया शिंदेसेनेचे अकोला उपजिल्हाप्रमुख मनिष रामाभाऊ कराळे, नामांकित सायं दैनिकाचा पत्रकार राजेश साळुंके, महादेव भगत, सागर कराळे सह इतर चार वरली बहाद्दर यांच्यावर सुद्धा गंभीर गुन्हे दाखल झाले होते परंतु एका पत्रकारावर प्राणघातक हल्ला केल्यामुळे या वरली बहाद्दरांची हिम्मत एवढी वाढली की त्यापैकी वरली माफिया असलेला राजेश साळुंके यांने पत्रकारितेच्या बळावर दादागिरी करीत थेट अकोट तहसील कार्यालय मधील नायब तहसीलदार सुधीर थेटे यांच्या दालनात घुसून शासकीय कामात अडथळा निर्माण करून जिवे मारण्याची धमकी दिली या सर्व घडलेल्या गंभीर प्रकारामुळे नायब तहसीलदार यांनी आक्रमक होऊन 18 मे रोजी शहर पोलीस स्टेशनला राजेश साळुंके विरुद्ध तक्रार दाखल केली होती

त्यामध्ये पुन्हा राजेश साळुंके याच्यावर बी एन एस 2023 नुसार 221,224 गुन्हे दाखल झाले असून पंधरा दिवसातच दुसरा गुन्हा दाखल झाल्यामुळे साळुंके विरुद्ध 126,135 (3) bns नुसार प्रतिबंधक कार्यवाही करण्यासाठी अकोट पोलिसांनी त्याला दंडाधिकारी तहसिलदार यांच्या समक्ष हजर केले असता राजेश साळुंके याला जामीनदार मिळाला नाही अखेर दिवसभराच्या संघर्षानंतर जमानत घेण्यासाठी कुणीच तयार नसल्याने साळुंके याला पुढील तारखेपर्यंत वैयक्तिक हमी पत्रावर जामीन देण्यात आला व्हाईट कॉलर म्हणून समाजात वावरणारा वरली माफिया म्हणून ओळखल्या जाणारा राजेश साळुंके याची पार्श्वभूमी सुद्धा तेवढीच घातक आहे 2005 व 2007 मध्ये या राजेश साळुंके वर देशद्रोहाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये साळुंके यांने नकली नोटा छापून चलनात आणल्या होत्या सोबतच बॉम्बे पोलीस ऍक्ट नुसार अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्यामुळे साळुंके याची जमानत घेण्यास कुणीच धजत नाही अशा घातक व गुंड प्रवृत्तीची जमानात घेतल्यास भविष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे या भीतीने राजेश साळुंके याला जामीनदार शोधण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे त्यामुळे पुढील दोन दिवसातच राजेश साळुंके याला जमानतदार मिळणार की तहसिलदाराकडून पुन्हा पुढील तारीख देण्यात येणार याची उत्सुकता अनेक पीडित कुटुंब, नायब तहसीलदार सह इतर अधिकारी वर्ग व धमकावलेल्या पत्रकार बांधवांच्या गोटात दिसून येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish