INDIA NEWS

Press

“कोणता हा झेंडा घेऊ हाती” शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

salim Khan 21 june 2025
गुंड प्रवृत्तीच्या दहशत माजवणाऱ्या पदाधिकाऱ्याची मात्र गोची..

अकोट मतदार संघातील व्हाईट कॉलर व सर्वमान्य असलेले दिग्गज नेते

अकोला शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सतत सावळा गोंधळ सुरू आहे किती जिल्हाप्रमुख व उपजिल्हाप्रमुख आहेत याची अधिकृत माहिती कुणालाच नाही विधानसभा की तालुका निहाय नियुक्त्या करण्यात आल्या की शहरी व ग्रामीण असा गोंधळ पदाधिकारी यांच्या बाबतीत कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे तसेच मागील तीन वर्षापासून आतुरतेने वाट पाहत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपल्या आहेत त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये प्रभागांमध्ये वर्चस्व निर्माण करण्याची चढाओढ सुरू झाली आहे शिंदेसेनेला अकोट मतदार संघात अतिशय सक्रिय व सर्वमान्य नेतृत्व हे गजानन पुंडकर यांच्या माध्यमातून लाभलेले आहे तिकीट वाटपामध्ये पुंडकर यांना विश्वासात घेतल्यास त्यांच्या दांडग्या अनुभवाचा शिंदेसेनेला नक्कीच फायदा होईल तसेच विधानसभा मतदारसंघांमध्ये असलेले तेल्हारा तालुक्यातील नवनिर्वाचित उपजिल्हाप्रमुख संजय आढाऊ हे सुद्धा जोमाने कामाला लागले आहेत हे दोन्हीही नेते व्हाईट कॉलर असून यांची चुकीची कोणतीही पार्श्वभूमी नाही तसेच जनसामान्यांमध्ये यांची चांगलीच क्रेझ आहे..परंतु पक्षांतर्गत असलेल्या गटबाजीमुळे अनेक गुंड प्रवृत्तीच्या व दहशत माजवणाऱ्या माफिया पदाधिकाऱ्याची मात्र गोची झाली आहे त्यामध्ये बांधकाम कामगारांना त्यांच्याच हक्काच्या पेट्या वाटप करून पुन्हा नगरसेवक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पदाधिकाऱ्याला यावेळी मात्र जनता धूळ चाखणार आहे सोबतच अनेक कार्यकर्ते ऐन वेळेवर ” कोणता हा झेंडा घेऊ हाती “अशी भूमिका बजावणार असल्याचे चित्र आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish