आम्ही फक्त सयाजीराव बाकी सर्वेसर्वा नवनीत लखोटिया
salim khan 5 July 2025
तारीख पे तारीख देऊन प्रशासनाकडून निव्वळ टाइमपास.. एस डी ओ मनोज लोणारकर यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह..
राजेश लखोटिया, प्रमोद चांडक, लुणकरण डागा, विजय कोठारी, मोहम्मद सलीम परवेज नबिउल्ला यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न..

अकोट शहरांमधील नामांकित असलेले बिल्डर राजेश लखोटिया यांच्या नावे असलेले अकोट पोपटखेड रोडवर असलेले वादग्रस्त लेआउट रद्द करण्याची आक्रमक मागणी किस्मत खान यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या कोर्टात केली आहे अकोट पोपटखेड रोडवरील ग्रामपंचायत मोहाळा हद्दीतील लखमापूर शिवारातील गट नंबर 45 व गट नंबर ३७ या लेआउट क्षेत्रफळाची फेरचौकशी प्रकरण उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांच्या समोर किस्मत खान यांनी दाखल केले आहे या प्रकरणांमध्ये नामांकित असलेले बिल्डर राजेश लखोटीयासह प्रमोद चांडक, लुणकरण डागा, विजय कोठारी, मोहम्मद सलीम परवेज नबिउल्ला असे पाच गैरअर्जदार आहेत परंतु प्रकरण दाखल झाल्यापासून मागील सतत तीन तारखेपासून गैरअर्जदाराकडून कुणीही गंभीर असल्याचे दिसत नाही वकीलपत्र दाखल करून सतत सुनावणी करिता तारीख पे तारीख घेऊन अर्जदाराच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे सदर लेआउट रद्द करण्याची मागणी किस्मत खान यांनी केली असून पाच पैकी कोणीही हजर झाले नसून हे प्रकरण गैरअर्जदाराच्याच नाही तर तहसीलदार, मंडळ अधिकारी, पटवारी अशा अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे त्यामुळे या प्रकरणांमध्ये तारीख पे तारीख देऊन पुढे ढकलण्यात येत असल्याचा आरोप किस्मत खान यांनी केला आहे
प्रतिक्रिया
2016 मध्ये यापूर्वीच्या शेतमालकाने एसडीओ कार्यालयामध्ये दोन सर्वे नंबरच्या मधोमध असलेला रस्ता वहीवाटीत नसल्याचा अर्ज केला होता त्या अनुषंगाने हा रस्ता रद्द करून नियमानुसार लेआउट आम्ही केलेले आहे तसेच दोन सर्वे नंबरच्या मधोमध रस्ता असून सुद्धा एकत्रित करता येतो
प्रमोद चांडक
नामांकित व्यापारी व शाळा संचालक अकोट

प्रतिक्रिया
या प्रकरणाचे सर्व कागदपत्रे व माहिती ही नवनीत लखोटिया यांनाच आहे त्यांनीच हा सर्व प्रकार केला आहे त्यामुळे मला या प्रकरणाबद्दल जास्त माहिती नाही
लुनकरण डागा
शाळा संचालक तथा बँक संचालक अकोट
प्रतिक्रिया
आम्ही फक्त सही मारणारे सयाजीराव आहोत या प्रकरणाची सर्व माहिती ही नवनीत लखोटीया यांनाच आहे
मोहम्मद सलीम परवेज नबिउल्ला
लेआउट भागीदार अकोट

प्रतिक्रिया
सदर प्रकरणांमध्ये लेआउट मंजूर करण्यापूर्वी चे सर्व कागदपत्रे एसडीओ मनोज लोणारकर यांच्या कोर्टासमोर आहेत आणि लेआऊट मंजूर झाल्यानंतरचे दस्तऐवज सुद्धा विद्यमान कोर्टासमोर आहेत त्यामध्ये स्पष्ट निदर्शनास येत आहे की लेआउट अगोदर रस्ता होता आणि आज रोजी त्यामध्ये दोन सर्वे नंबरच्या मधोमध असलेला रस्ता रद्द करण्यात आला आहे रस्ता हा रद्द करून दोन वेगवेगळे सर्वे नंबर एकत्रित करण्यात आले आहेत तरीसुद्धा ३ जुलैला पटवारी यांनी सदरील वादातील भूखंडावर जाऊन पाहणी केली असता त्यांचा अहवाल येणे बाकी आहे
अॅड फाजील पटेल
ज्येष्ठविधीज्ञ अकोट







