बोर्डी येथील जुगार अड्ड्यावर धाड, मात्र अंजनगाव रोडवरील जुगार अड्ड्याला मूकसंमती
Salim Khan 27 July 2025
अकोला पोलिसांमध्ये वाई फाट्यावरील जुगार अड्ड्यावर धाड टाकण्याची हिंमत नाही, पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या प्रहार मोहिमेला माजी नगरसेवक तथा शिंदे सेना नेत्याचे थेट चॅलेंज..
अर्चित चांडक पोलीस अधिक्षक, अकोला यांचे निर्देशा प्रमाणे अकोला जिल्हयामध्ये अवैध धंदयांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबविण्यात येत आहे
त्या अंतर्गत दि.२६ जुलै २०२५ रोजी अकोट ग्रामीण पोलीसांना माहीती आधारे अकोट बोर्डी रोडवरील अब्दुल सलीम अब्दुल जलील यांच्या शेतालगत असलेल्या झोपडी जवळील झाडाखाली काही इसम पैसे लावून जुगार खेळत आहेत. अशा मिळालेल्या माहितीवरून सदर ठिकाणी जुगार रेड केला असता त्या ठिकाणी जुगारी शेख अक्रम शेख मुस्तफा वय ४६ वर्षे रा. इक्तेखार प्लॉट अकोट . अन्वर अली खुर्शीद अली वय ५० वर्षे रा. ताहपुरा, अकोट .समीर खान शेर खान वय ३५ वर्षे रा. खतीब पुरा अकोट . मोहम्मद सलीम मोहम्मद अकबर वय ३३ वर्षे रा. टेकडीपुरा, अकोट.शेख अयुब शेख सत्तार वय ४२ वर्ष रा. गाजी प्लॉट, अकोट . मोहम्मद अकील मोहम्मद मुजेदार वय ४० वर्षे रा. बडा अलावा अकोट .फिरोज अली जमीर अली वय ४१ वर्षे रा. गाजी प्लॉट, अकोट असे इमस पैशाचे हारजीतवर जुगार खेळतांना मिळून आले. वरील सर्वांचे अंग झडतीत व डावावर एकुण ३ लाख ५६ हजार ०६रुपये तसेच ०६ मोबाईल कि. ७१ हजार ०६ रुपये रुपये एकुण ०४ चार मोबाईल साधारण किंमत २ लाख, ५० हजार रुपये असा एकुण ३ लाख २४ हजार ५६० रुपये चा माल मिळुन आला. पुढील कायदेशीर कार्यवाही वरिष्टांचे मार्गदर्शनात अकोट ग्रामीण पोलीस करीत आहेत. सदरवी कारवाई पोलीस अधिक्षक, अर्चित चांडक यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधिक्षक, रेही सा., उपविभागीय पोलीस अधिकारी, अकोट पडघन यांचे मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन चे ठाणेदार किशोर जुनघरे, पोलीस कर्मचारी उमेश सोळंके, हरीष सोनवणे, शिवकुमार तोमर, वासुदेव ठोसरे, पोका राजेश माळेकर, सुनिल पाटील यांनी केली.

परंतु मागील पंधरा दिवसापासून अकोट-अंजनगाव रस्त्यावरील वाई -दिवठाणा फाट्या जवळील जुगार अड्ड्यावर दररोज वीस ते पंचवीस लाखांची उलाढाल होत असून खुलेआम पोलिसांच्या मूकसंमतीने हा जुगार अड्डा सुरू आहे त्यामुळे अकोट पोलीस प्रहार मोहिमेंतर्गत मुख्य माफियाला सोडून किरकोळ जुगार अड्ड्यावरच धाड टाकून एक प्रकारची पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांची दिशाभूल व फसवणूक करीत आहेत माजी नगरसेवक तथा शिंदे सेना नेत्यांच्या या जुगार अड्ड्यावरील वीस ते पंचवीस लाख रुपयाचा मुद्देमाल सोडून किरकोळ धाडी टाकून पोलीस अधिक्षक यांची शाबासकी लाटण्याचा प्रयत्न सुद्धा अकोट पोलिसांकडून होताना दिसत आहे
तसेच फडणवीस सरकार मध्ये शिंदे सेना सामील असल्याने प्रहार मोहीम आमचे काहीच करू शकत नाही आमच्या जुगार अड्ड्यावर कारवाई करण्याची हिम्मत अकोला पोलिसांमध्ये नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हात डोक्यावर असल्यामुळे जुगार अड्डे खुलेआम सुरू राहतील असा आत्मविश्वास या जुगार माफीयांना आहे त्यामुळे पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांची प्रहार मोहीम खरोखरच यशस्वी होत आहे का ? की किरकोळ कार्यवाहीचा दिखावा करून मुख्य जुगार माफीयांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न स्थानिक पोलिसांकडून होत आहे असे अनेक संशय अकोट करांच्या मनात गोंधळ निर्माण करीत असून पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत







