आरएसएस पदाधिकारी तरी वर्षा गावंडे ची दहशत भारी !
शिक्षिका वर्षा गावंडे कडून शासनाला करोडो रुपयांचा चुना..निलंबन तथा वसुली कधी ? शिक्षण व्यवस्था हतबल.. सरस्वती विद्यालयाचा पुन्हा एकदा भोंगळ कारभार चव्हाट्यावर..

अकोट: मागील जवळपास सहा महिन्यापासून सरस्वती विद्यालय अकोट मधील शिक्षिका वर्षा गावंडे यांनी शासनाची दिशाभूल करून करोडो रुपयांची फसवणूक केली आहे या प्रकरणात आतापर्यंत वर्षा गावंडे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून निलंबन प्रक्रिया तथा करोडो रुपयांची वसुली करणे गरजेचे होते परंतु संस्थेचे अध्यक्ष व शाळा व्यवस्थापन समिती शिक्षिका वर्षा गावंडे यांचे निलंबन करण्यास घाबरत असल्याचे चित्र आहे तसेच वर्षा गावंडे कडून ब्लॅकमेल किंवा दबाव तंत्राचा वापर होत असल्याचा संशय निर्माण झाला आहे
वर्षा गावंडे यांनी 2014 – 15 या वर्षात प्राथमिक शिक्षिका म्हणून कर्तव्य बजावत असताना त्याच वेळी सावित्रीबाई फुले बीएड कॉलेज अकोट येथे नियमित बीएड सुद्धा केले एकाच वेळी नोकरी व शिक्षण घेऊन अशक्य हे शक्य करून दाखवले आहे

एवढ्यावरच न थांबता बीएड पदवी प्राप्त करून 2016 मध्ये सुधारित वेतनश्रेणी सुद्धा लागू करून घेतली आहे हा सर्व प्रकार संस्थेच्या विनापरवानगी झालेला आहे अशी प्रतिक्रिया संस्था अध्यक्ष मोहन आसरकर यांनी दिली आहे परंतु एकीकडे शाळेत कर्तव्यावर हजर राहून दुसरीकडे त्याचवेळी बीएड कॉलेजला सुद्धा हजेरी नोंद आहे सोबतच बीएड झाल्यानंतर सुधारित वेतन श्रेणी चा प्रस्ताव मुख्याध्यापकाकडून शिक्षणाधिकारी यांच्याकडे जातो त्यानंतर ती वेतनश्रेणी मंजूर केल्या जाते वर्षा गावंडे यांची भरघोस पगार वाढ होते ही सर्व शासनाची दिशाभूल करून करोडो रुपयांची फसवणुकीची प्रक्रिया होत असताना मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन तथा उच्चशिक्षित असलेले अध्यक्ष यांना या सर्व प्रकाराची कल्पना नाही या प्रकारापासून अनभिज्ञ असल्याचे ढोंग आज रोजी अध्यक्ष करीत आहेत नियमाप्रमाणे तत्काळ या सर्व प्रकाराची चौकशी करून शाळा व्यवस्थापने वर्षा गावंडे यांना निलंबित करणे आवश्यक होते परंतु अध्यक्ष आणि सचिवाच्या भित्रेपणामुळे आज शासनाला शिक्षिका वर्षा गावंडे यांच्याकडून करोडो रुपयांचा चुना लागत आहे अध्यक्ष यांच्या नियुक्तीच्या आदेशावर शिक्षक हा रुजू होतो त्याचप्रमाणे गैरप्रकार होत असल्यास तात्काळ निलंबित करण्याचे अधिकार सुद्धा त्याच अध्यक्षाला असतात परंतु सरस्वती शाळेचे अध्यक्ष उच्च शिक्षित असून सुद्धा वर्षा गावंडे यांच्या दबावाला बळी पडत असल्याचे दिसून येते त्यामुळे गावंडे यांचे निलंबन करण्याची हिंम्मत शाळा व्यवस्थापनामध्ये नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले म्हणून शासनाने यामध्ये पुढाकार घेऊन तात्काळ वर्षा गावंडे सह मुख्याध्यापक व दोशींना पाठीशी घालणाऱ्या शाळा व्यवस्थापनावर कार्यवाही करावी अशा तक्रारी दिल्लीपर्यंत गेल्याची माहिती आहे

यादरम्यान सरस्वती शाळेचे अध्यक्ष आरएसएस निगडित असल्याने शिक्षण व्यवस्था सुद्धा करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाल्यावरही वर्षा गावंडे यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येते परंतु दिल्लीश्वर यावर निर्णय घेण्यास सक्षम आहेत की पुन्हा नेहमीप्रमाणे या भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देतील हे बघणे औत्सुक्याचे ठरेल







