INDIA NEWS

Press

चिखलदऱ्यातील जिप्सी चालकांची महिला पर्यटकांशी मुजोरी – नामांकित उद्योजिका अर्चना सवाई आक्रमक..

salim khan 12 august 2025

जम्मूच्या काश्मीरला आतंकवाद्यांचा धोका अन् विदर्भाच्या काश्मीरचा जिप्सीला ठेका

आतंकवाद” की लुटमार, जिप्सी चालकांची” दादागिरी” पर्यटकांमध्ये दहशत !

चिखलदरा प्रशासनाकडून “हप्तेखोरी” तर जिल्हा यंत्रणेची मूकसंमती

जिप्सी चालकांवर काँग्रेसच्या माजी महिला अध्यक्षा अर्चना सवाई भडकल्या.. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आक्रमक

जम्मू-काश्मीरला आतंकवादाचा धोका नियमित असतोच त्याचप्रमाणे विदर्भातील काश्मीर समजले जाणारे चिखलदऱ्याला सुद्धा जिप्सी चालक रुपी आतंकवादांच्या दहशतीला नियमित सामोरे जावे लागत आहे विदर्भातील चिखलदरा हे एकमेव पर्यटन स्थळ आहे परंतु जिप्सी चालकांच्या दहशतीमुळे पर्यटक पुरता धास्तावलेला आहे त्यामुळे अनेक पर्यटकांनी चिखलदरा कडे पाठ फिरवली आहे

चिखलदरा हे विदर्भातील तथा अमरावती जिल्ह्यातील सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये निसर्गरम्य वातावरणात वसलेले पर्यटन स्थळ आहे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबई, पुणे, नागपूर सह मध्य प्रदेश, तेलंगाना, छत्तीसगड, गुजरात अशा अनेक राज्यातून पर्यटक येत असतात विशेषता पावसाळ्यात लाखो पर्यटकांची वर्दळ सुरू असते परंतु चिखलदरा मधील पंचबोल पॉईंटवर जिप्सी चालकांच्या अतोनात दादागिरी चा वाईट प्रसंग अनेक पर्यटकांनी अनुभवला आहे अक्षरशः लुटमारीचा प्रकार सुद्धा पर्यटकांसोबत घडला आहे अमरावती येथील नामांकित महिला उद्योजक तथा माजी महिला काँग्रेस अध्यक्षा अर्चना सवाई यांना अशा अनेक वाईट अनुभवांना सामोरे जावे लागले एक किलोमीटर अंतरावर असलेल्या पंचबोल पॉईंट ला जाण्यासाठी 2000 ते 3000 शुल्क हा दादागिरीने आकारला जात असून पर्यटकांच्या स्वतःच्या कारला सुद्धा बंदी घालण्यात येते सोबतच रस्ता बंद करून बॅरिकेड लावून जिप्सी चालकांची मनमानी सतत बघायला मिळते या जिप्सी चालकांच्या लुटमारी कडे चिखलदरा प्रशासन सुद्धा डोळेझाक करीत आहे दिवसेंदिवस ही दहशत वाढत असून आर्थिक लूटमारीचा आतंकवाद खुलेआम सुरू आहे या सर्व गंभीर प्रकाराला स्थानिक प्रशासनाची मुकसंमती असल्याचे दिसून येते सोबतच अनेक महिला पर्यटक यांच्याशी वाद करून जिप्सी चालकांनी मारहाण केल्याचे अनेक व्हिडिओ वृत्त सुद्धा मागील काळात प्रसारित झाले आहेत

एवढा लाजिरवाणा प्रकार होत असून सुद्धा अमरावती जिल्हा प्रशासन मात्र या जिप्सी चालकांसमोर हतबल झाल्याचे दिसून येते यापुढे ही मनमानी अशीच सुरू राहिली तर पर्यटक मात्र विदर्भातील या एकमेव असलेल्या काश्मीरमध्ये येण्यासाठी कायमस्वरूपी पाठ नक्कीच फिरवतील अशी नाराजी अनेक पर्यटकांनी व्यक्त केली आहे

चिखलदरा येथे पंचबोल पॉईंट वर जाण्यासाठी 2000 ते 2500 रुपये जिप्सी चालक शुल्क आकारतात एक किलोमीटरच्या अंतरासाठी ही रक्कम खूप जास्त प्रमाणात आहे त्यामुळे मध्यमवर्गीय परिस्थिती असणाऱ्या पर्यटकांसाठी ही बाब गंभीर स्वरूपाची आहे याची तात्काळ जिल्हा प्रशासनाने दखल घ्यावी

सारिका सवाई
पर्यटक अमरावती

जिप्सी चालक महिलांसोबत वाद विवाद करतात पर्यटक महिलांना अपमानास्पद वागणूक देतात सोबतच दादागिरी ची भाषा वापरून आर्थिक आणि मानसिक छळ करतात यांच्या मुसक्या आवळून जिल्हा प्रशासनाने तात्काळ जिप्सी चालकांच्या दहशती मधून पर्यटकांना मुक्त करावे.
संगीता सवाई , पर्यटक अमरावती

चिखलदरा येथील जिप्सी चालकांच्या वागणुकीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक प्रशासनाचा कोणताही वचक या जिप्सी चालकांवर असल्याचे दिसत नाही उलट “आम्ही प्रशासनातील सर्व घटकांना हप्ते देतो” त्यामुळे पर्यटकांची आर्थिक लूटमार आम्हाला करावीच लागते असे बेधडक उत्तरे जिप्सी चालकांकडून पर्यटकांना दिल्या जातात त्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण करून चिखलदऱ्याचे महत्त्व कमी करण्याचे हे कट कारस्थान रचल्या जात आहे

रोहिणी होले
पर्यटक अमरावती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish