उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आयपीएस अधिकाऱ्याला धमकी; राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह !
salim khan 5 September 2025
अजित पवारांच्या या बेताल वागण्याने संपूर्ण महाराष्ट्र आश्चर्यचकित..अवैध धंद्यांना प्रोत्साहन देण्याच्या नादात स्वच्छ प्रतिमेला धक्का..

Akola : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका प्रामाणिक व निर्भय आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना उघडपणे धमकी दिल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे. प्रशासनातील महिला अधिकाऱ्याला धाक दाखवण्याचे धाडस राज्याच्या दुसऱ्या क्रमांकाच्या खुर्चीवर बसलेल्या नेत्याकडून होणे ही लोकशाहीला काळीमा फासणारी बाब आहे.

कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिस यंत्रणेलाच जर मंत्र्यांकडून दबाव, धाक व धमक्या दिल्या जात असतील तर सामान्य जनतेच्या सुरक्षेची हमी कोण देणार, असा थेट प्रश्न समाजमनात निर्माण झाला आहे. राज्यातील उपमुख्यमंत्री पदाचा वापर करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाकवण्याचा प्रयत्न म्हणजे सत्तेचा उघड दुरुपयोग होय.

लोकप्रतिनिधींनी कायद्यापुढे नतमस्तक होणे अपेक्षित असताना अजित पवार यांचे वर्तन हे सरळसरळ गुंडगिरीसारखे आहे. प्रशासनावर राजकीय बडेजाव दाखवून, प्रामाणिक अधिकाऱ्यांची बदनामी करण्याचा आणि त्यांना मानसिक त्रास देण्याचा प्रकार सहन केला जाणार नाही, अशीच जनतेची भावना उमटत आहे.

या प्रकरणात अजित पवारांनी दिलेल्या धमकीची तात्काळ चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा राज्यातील पोलीस दल व अधिकारी वर्गाचा आत्मविश्वास ढासळेल, अशी गंभीर चिंता व्यक्त होत आहे.







