अजित दादांचा युटर्न; अखेर सत्तेची मस्ती जिरली अन् आ.अमोल मिटकरी ची दिलगिरी..
salim khan 6 September 2025

Akola: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयपीएस अंजना कृष्णा यांच्याशी केलेल्या वर्तणुकीतून उघड झालेले सत्य म्हणजे सत्ताधाऱ्यांचा गर्व आणि दडपशाहीची पद्धत. दबाव टाकल्यानंतर अचानक घेतलेला त्यांचा यू-टर्न हा केवळ आपली प्रतिमा वाचवण्यासाठीचा स्वार्थी खेळ आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट पवारांनी अंजना कृष्णा यांची माफी मागावी अशी मागणी केली, तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी तर अंजना कृष्णा यांच्या आयपीएस पदावर संशय घेऊन यूपीएससीकडे कागदपत्र तपासणीसाठी पत्र धाडण्याचे धाडस केले. पण पवारांच्या भूमिकेत झालेल्या पलटीमुळे मिटकरींनाही शेवटी लाजिरवाणी दिलगिरी व्यक्त करावी लागली.

मात्र हा दिलगिरीचा प्रकार म्हणजे लोकांची दिशाभूल करण्याचा केवळ एक दिखावा आहे. अंजना कृष्णा यांना आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून मानसिक छळ सहन करावा लागेल, अशी गंभीर शक्यता आहे. याआधीही अनेक प्रामाणिक अधिकाऱ्यांना अशाच राजकीय दबावामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर अंजना कृष्णा यांच्यावरही घाणेरड्या राजकारणाचा बळी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

अजित पवारांसारख्या सत्ताधीशांच्या अहंकाराला न जुमानता लढा देणाऱ्या अंजना कृष्णा यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला आहे, हे वास्तव दुर्लक्षित करता येणार नाही. अखेर या गलिच्छ राजकीय खेळाला कंटाळून त्या बदली मागतील का, की राजकीय दबावाचा बळी ठरतील – हा प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठामपणे उभा राहिला आहे.







